नंदुरबार : नवापूर पोलिस स्टेशनच्या (Nawapur Police Station) लॉकअपमधून चार ते पाच आरोपी खिडकी तोडून पळाल्याची माहिती आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. नवापूर पोलीस ठाण्यातील कैदेमध्ये असलेले चार-पाच आरोपी आहेत. निकर आणि बनियन घातलेल्या अवस्थेतच आरोपींनी पोबारा केला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी नवापूर पोलीस अधिकारी व कर्मचारी रवाना झाले आहेत. दरोड्याच्या संशयात त्यांना अटक करण्यात आले होते.
दरोड्यातील संशयित असल्याची माहिती : गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या नवापूर पोलीस ठाण्याच्या कारागृहातील खिडकीचे ग्रील तोडून चार ते पाच आरोपी फरार झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर आरोपी हे दरोड्यातील संशयित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहे व संबंधित फरार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
आरोपींनी तोडली जेलची खिडकी : नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये अटकेत असलेले चार ते पाच आरोपी लॉकअपच्या खिडक्या तोडुन फरार झाल्याची माहीती समोर येत आहे. दरोड्याच्या आरोपाखाली या पाच संशयीतांना ताब्यात घेण्यात आल होत. त्याना पुरुष लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र लॉकअपच्या मागच्या भिंतीला असलेल्या खिडकीची गज तोडुन हि आरोपी फरार झाली आहे. खिडकीतुन उड्या मारत चड्डी बनीयन वरच पोबारा काढत हे आरोपी ऊसांच्या शेतामध्ये फरार झाले आहेत. पोलीस यांच्या मागावर असुन ज्या शेतात आरोपी फरार झाले आहेत. त्या शेतांना पोलीसांनी विळाखा देखील टाकला आहे. मात्र आरोपींच्या फरार होण्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची नाचक्की झाली असुन याबाबत पोलीस दलातील कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. मात्र प्रत्यशदर्शी गुराखी आणि शेतकरी यांनी या घटनेबाबत माहीती दिली आहे.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल : संशयित आरोपी जेल मधून फरार झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी नवापूर पोलीस ठाण्यातील कारागृहात जाऊन पाहणी केली आहे. त्याचप्रमाणे संबंधित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून त्यांची रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.