ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये 15 कोरोनाबाधित वाढले; दोघांच्या मृत्यूमुळे चिंतेत भर

नंदुरबारमध्ये मंगळवारी 15 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 284 वर पोहोचली. 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या 14 वर पोहोचली आहे.

Nandurbar corona update
नंदुरबार कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 15, 2020, 9:46 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यात एकाच दिवशी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील नंदुरबार व विसरवाडी येथील दोन बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. नंदुरबारातील एका 71 वर्षीय वृध्द तर विसरवाडीतील 52 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी कोरोनामुळे दोन मृत्यू होणे ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे जिल्ह्यात मृतांचा आकडा 14 वर पोहोचला असून बाधितांची संख्या 284 झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात महिन्याभरापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 300 च्या जवळपास येवून ठेपली आहे. गेल्या पाच दिवसांपासून येणार्‍या अहवालांमध्ये दररोज दहाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मंगळवारी एकाच दिवशी पुन्हा 15 रुग्णांची भर पडली आहे.

सकाळी आलेल्या अहवालात तीन जण पॉझिटिव्ह आढळले आहे. यात नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील 52 वर्षीय महिला, नंदुरबार येथील जयवंत चौकातील 71 वर्षीय वृध्द पुरुष तर भोई गल्लीतील 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या तिघांवर उपचार सुरु असताना नंदुरबारच्या जयवंत चौकातील 71 वृध्दाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. तर विसरवाडीतील 52 वर्षीय महिला उपचार घेत असताना सायंकाळी मृत्यू झाला. यामुळे एकाच दिवशी कोरोनाचे दोन बळी गेले आहेत.

सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये 12 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात नंदुरबार येथे 42 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, नंदुरबार येथील तुलसी विहारात 75 वर्षीय वृध्द पुरुष, दत्त कॉलनीत 44 वर्षीय पुरुष तर नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे 55 वर्षीय पुरुष आणि शहादा येथील 45 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय पुरुष, शहादा तालुक्यातील जयनगरात 28 वर्षीय युवक, गुजर गल्लीत 53 वर्षीय पुरुष, सरदार रेसीडेन्सी मालोनी शहादा येथे 36 वर्षीय महिला व शहाद्यात एक 27 वर्षीय युवक अशा 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

जिल्ह्यात कोरोनामुळे दोन बळी गेल्याने मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. तर बाधितांचा आकडा 284 झाला आहे. बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांची माहिती आरोग्य विभागाचे पथक संरक्षण मोहिमेतून घेत आहे.

सहा जण कोरोनामुक्त

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बाधित रुग्णही कोरोनावर मात करुन बरे होत आहेत. दिवसभरात सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात नंदुरबार येथील मंगळबाजारातील एक व्यक्ती, गिरीविहार सोसायटीतील एक व्यक्ती, कोकणीहील येथील एक व्यक्ती, भाट गल्लीतील एक व्यक्ती तर शहादा येथील मिरा कॉलनीतील दोन व्यक्ती, असे सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे 284 पैकी 174 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 87 जण उपचार घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.