ETV Bharat / state

पावसामुळे केळी, चारोळी आणि आंबा पिकांचे नुकसान; भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी - निसर्ग चक्रीवादळाचे नंदुरबारमध्ये परिणाम

दरवर्षी राणीपूर, म्हसावद परिसरात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. पण यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आलेल्या वादळी वाऱ्याने केळी बागा उद्ध्वस्त केल्या. त्याच सोबत सातपुड्याचा दुर्गम भागात चारोळी आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.

farmers crops damage in nandurbar due to nisarg cyclone
वादळी पावसामुळे केळी, चारोळी आणि आंबा पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची भरपाई देण्याची मागणी
author img

By

Published : Jun 4, 2020, 11:04 AM IST

नंदुरबार - निसर्ग चक्रीवादळामुळे नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस आणि वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे, शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या तर आंबा आणि चारोळी या पिकांचेही नुकसान झाले. याचे पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी आलिबागजवळ धडकले. यावेळी ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास वादळाने किनारा ओलांडून राज्यात प्रवेश केला. याच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह पाऊस झाला. यात शहादा तालुक्यात राणीपूर आणि म्हसावद परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागांची झालेली स्थिती....

दरवर्षी राणीपूर, म्हसावद परिसरात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. पण या वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे आलेल्या वादळी वाऱ्याने केळी बागा उद्ध्वस्त केल्या. त्याच सोबत सातपुड्याचा दुर्गम भागात चारोळी आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानभरपाईचे लवकरात लवकर पंचनामे करावे, तसेच त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचा - बेलीपाडा अस्वल हल्ला: वनविभागाने लावले 3 ट्रॅप कॅमरे अन् 1 पिंजरा

हेही वाचा - पोलिसांना गुंगारा देत वेगात सुटलेला मद्याचा ट्रक नाल्यात उलटला, चालक पसार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.