ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; तळोदा परिसरात भीतीचे वातावरण - latest news about leopard attack

कळमसरे महिदा येथील शेतकरी व शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शरद खंडू चव्हाण (५२) हे रात्री ८ वाजेच्या सुमारास शेतीकाम आटोपून लहान ट्रॅक्टरने घराकडे जात होते. याचवेळी चव्हाण यांच्यावर अचानक बिबट्याने मागून हल्ला केला. या हल्ल्यात शरद चव्हाण यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

farmer-dies-in-leopard-attack
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
author img

By

Published : May 19, 2020, 9:56 AM IST

नंदुरबार - तळोदा तालुक्यातील कळमसरे महिदा येथील शेतातून घरी परतणार्‍या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे, परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतमजूरदेखील कामावर येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

कळमसरे महिदा येथील शेतकरी व शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शरद खंडू चव्हाण (५२) हे रात्री ८ वाजेच्या सुमारास शेतीकाम आटोपून लहान ट्रॅक्टरने घराकडे जात होते. याचवेळी चव्हाण यांच्यावर अचानक बिबट्याने मागून हल्ला केला. या हल्ल्यात शरद चव्हाण यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शरद चव्हाण अजून घरी परत कसे आले नाही हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा शेतात गेला होता. शेतात जात असताना रस्त्यावरच शरद चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ दाखल झाले.

तळोदा पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण, फौजदार ज्ञानेश्‍वर पाकळे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोहडे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. रात्री उशिरा तळोदा उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह अणण्यात आला होता. यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.

शरद चव्हाण यांना शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला होता. तर मराठा समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहात होते. नेहमी ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांच्या या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वनविभागातर्फे बिबट्याच्या शोध घेण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.