नंदुरबार - जिल्ह्यातील शनिमांडळ येथील एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. लॉकडाऊनंतरच्या काळातील जिल्ह्यामधील ही पहिलीच आत्महत्येची घटना आहे.
कैलास पंडीत पाटील (५८), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शनिमांडळ येथील रहिवासी असून त्यांच्याकडे अल्प शेती होती. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, त्यांच्यावर काही कर्ज असल्याने ते सतत चिंतेत राहायचे. त्याच कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शनिमांडळ शिवारातील शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत गोपीचंद कैलास पाटील यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.