नंदुरबार - शहरातील नंदुरबार-निझर रस्त्यावर रॉंग साईडने आलेल्या भरधाव वेगातील ट्रॉलीने कारला ( Ertiga Trolley In Nandurbar ) जबर धडक दिल्याने 3 जण ठार, तर 2 जण जखमी झाल्याची घटना ( 3 Death In Nandurbar Ertiga Trolley ) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त कारच्या चक्काचूर झाला असून, उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आले आहे. अपघातातील मृतांना जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे, तर जखमींवर उपचार सुरु आहे.
निझर रस्त्यावर भीषण अपघात - नंदुरबार शहराबाहेरील निझर रस्त्यावरून प्रशांत रमणभाई सोनवणे हे त्यांच्या ताब्यातील अर्टिगा कार (क्र.जी.जे 15 सि.जी 0722) धमडाई गावाकडे जात असताना हॉटेल हायवे समोरील रस्त्यावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रॉलीने ( क्र.जी.जे 18 ए.जे 1773) अर्टिका गाडीला जोरात धडक दिली. या धडकेत अर्टिका गाडी ड्रायव्हर साईडची बाजू पूर्णपणे दाबली गेली. या भीषण अपघातात कार चालक प्रशांत रमणभाई सोनवणे (40) रा.वलसाड (गुजरात), अनिल रामदास सोळंकी (35) रा. हाटमोहिदादा ता.जि नंदुरबार ह. मु.उधना व हिरालाल सुभाष पवार (35) रा. शहादा ठार झाले, तर विशाल शरद पवार (29) रा.शिरूड चौफुली, शांतीनगर, शहादा योगेश उर्फ नारायण अमृत सोनवणे रा. शहादा जखमी झाले. अपघात झाल्यानंतर ट्रॉली चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
लग्न समारंभ आटोपून परतताना अपघात - अपघात एवढा भीषण होता की, कारच्या ड्रायव्हर साईडची बाजू चेंदामेंदा झाली होती. अपघातातील जखमी विशाल पवार शहाद्यात सलूनचे काम करीत असतात. त्यांच्या मामा भावाचे लग्न पथराई येथे गुरुवारी होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर नंदुरबार येथील भाऊ का ढाबा हॉटेलमध्ये प्रशांत सोनवणे, योगेश सोनवणे, श्रीकांत सोनवणे, अनिल सोलंकी, हिरालाल पवार यांनी सोबत जेवण केले. जेवण आटोपून पुन्हा ते धमडाई गावाकडे निघाले. यावेळी हा अपघात झाला.