ETV Bharat / state

हिना गावित यांना लोकसभेची उमेदवारी नको- सर्वपक्षीय नेत्यांच्या फोरमची मागणी - आमदार चंद्रकांत रघुवंशी

District Development Forum : नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या 25 वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर तसंच गावित कुटुंबीयांविरुद्ध एकत्र लढा देण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचं आयोजन केलंय. यावेळी विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी केलीय.

District Development Forum
District Development Forum
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 11:29 AM IST

Updated : Jan 8, 2024, 11:35 AM IST

डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचं आयेजन

नंदुरबार District Development Forum : जिल्ह्यात एकाच परिवारातील भाजपाचं नेतृत्व कमी करण्यासाठी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून सर्व पक्षीय नेते एकत्र आले. या फोरमकडून खासदार डॉ. हिना गावित, मंत्री विजयकुमार गावित व जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या विरोधात लढा देण्यासाठी रविवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी भाजपाचे आमदार व नेते मंडळीही उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह सर्व नेतृत्वानं भाजपा पक्षश्रेष्ठीकडे खासदार हिना गावित यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊ नये अशी एकमुखानं मागणी केलीय. दुसरा उमेदवार दिल्यास एक ताकदीनं निवडून आणू, असा दावा यावेळी त्यांनी केलाय.

जनताच जिल्ह्याची खरी शिल्पकार : जिल्ह्याच्या विकास लोक चळवळीच्या व अस्मितेचा विषय झाला पाहिजे. जिल्हा निर्मितीच्या 25 वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आणि वस्तुस्थितीवर चर्चा होणं आवश्यक आहे. जिल्ह्याची खरी शिल्पकार ही जनताच आहे. राजकीय मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन 'डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम मुहूर्तमेढ विकसित नंदुरबार' या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केलं. याप्रसंगी जिल्हा निर्मितीचा 25 वर्षानंतर काय साध्य झालं? यावर मंथन करण्यात आलं. यावेळी सर्व पक्ष नेतृत्वानं मंत्री, खासदार व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याविरोधात आवाज उठवलाय.

डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचा मुख्य उद्देश काय : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवारी या उपक्रमाचं शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी रघुवंशी म्हणाले, "डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम राजकारण विरहित काम करणार आहे. लोकप्रतिनिधी आदिवासी आदिवासींमध्ये शासनाच्या योजना राबवत असताना भेदभाव करत आहेत. समाजात विषमता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला विरोध आहे. आम्ही आमदार, खासदारांच्या शर्यतीत नाहीत. परंतु, आम्हाला जिल्ह्याच्या खरा विकास करून दाखवायचा आहे. यापुढं जिल्ह्याच्या समतोल विकास साधणारे लोकप्रतिनिधी जनतेनं निवडून द्यावा."

25 वर्षानंतरही जिल्ह्याचा विकास नाही : भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ राजेंद्रकुमार गावित म्हणाले, "नंदुरबारच्या जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याचे प्रश्न गंभीर होते. आजही परिस्थिती तीच आहे. सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्ह्याची निर्मिती झाली. परंतु, आजही परिस्थिती 'जैसे थे' आहे. गाई, मेंढ्या,शेळ्या वाटल्यानं विकास होत नाही. आदिवासींना विकास रोखण्याचं काम आज होतंय."

हेही वाचा :

  1. Child Death In Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात तीन महिन्यात दगावले 179 नवजात बालकं, आता सुरू केलं 'लक्ष्य 84 डेज मिशन'
  2. ATM Cash Theft Case Nandurbar : एटीएम व्हॅनमधील रक्कमेवर कर्मचाऱ्याचाच डल्ला, तब्बल एक कोटी पाच लाख रुपये लंपास
  3. Cruiser Accident Nandurbar: धक्कादायक! क्रूझर नाल्यात कोसळल्याने भाविकांवर काळाचा घाला; चार ठार

Last Updated : Jan 8, 2024, 11:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.