ETV Bharat / state

आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्काराचे वितरण - Nandurbar latest news

आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण जिल्हा परिषद येथील याह मोगी सभागृहात पार पडला.

आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्काराचे वितरण
author img

By

Published : Feb 16, 2021, 6:57 PM IST

नंदुरबार - आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण जिल्हा परिषद येथील याह मोगी सभागृहात पार पडला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून सहा ग्रामपंचायती व त्यातून एक जिल्हास्तरीय ग्रामपंचायत निवड करून पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामपंचायतीने बाजी मारली.

विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय आर.आर.पाटील सुंदरगाव पुरस्कार-

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते स्व.आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण करण्यात आले. विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी विसरवाडी ग्रामपंचायत आहे. गावातील सर्व सुविधा व स्वच्छते हे निकष पाहून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकसहभागातून कामे केल्यास गाव सुंदर बनेल- सीमा वळवी

लोकसहभागातून चांगले कामे केल्यास सुंदर गावे निर्माण करता येतील. गावात स्वच्छता अभियान राबवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, असे जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी यावेळी सांगितले. विजेत्या गावांचा आदर्श घेऊन इतरही गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील अधिकाधिक गावे सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे.

विजेत्यांना सन्मानपत्र व बक्षीस

स्व.आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींची निवड तालुकास्तरावर तर एक जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री पाटील, महिला व बालविकास सभापती निर्मला राऊत, कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील, पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, बायजाबाई भील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते.

राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मानस- बकाराम कावित

जिल्ह्यातून सहा तालुक्यांपैकी जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी विसरवाडी ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. विसरवाडी ग्रामपंचायतीत हागणदारी मुक्ती योजना राबविताना ग्रामपंचायतीतर्फे ड्रोन कॅमेरा विकत घेऊन त्याद्वारे सकाळी गावाच्या बाहेरील परिसरावर फिरवून नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती सरपंच बकाराम गावित यांनी दिली. उघड्यावर शौच करणाऱ्यास अकराशे रुपयाच्या दंड वसूल करण्यात येत होता. त्याचबरोबर गावात शंभर टक्के घरकुल योजना राबविण्यात आली. महामार्ग क्रमांक 6 वर असलेली विसरवाडी ग्रामपंचायतीवर अधिकारी लक्ष ठेवून होते. त्यामुळे गावात स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून यात यश आले. भविष्यात राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचे माणूस डोळ्यासमोर ठेवून काम करू, अशी ग्वाही सर्वांनी सरपंच बकाराम गावित यांनी यावेळी दिली.

हेही वाचा- भाजपला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, विरोधी पक्ष नेते पदी काँग्रेसचे रवी राजाच...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.