ETV Bharat / state

गुजरातमधील भीषण अपघातात नंदुरबारमधील दाम्पत्याचा मृत्यू, २ मुले जखमी

गुजरातमधील उच्छल-निझर रस्त्यावरील गवाण गावाजवळ कार आणि डंम्परची समोरासमोर धडक झाली. यामध्ये नंदुरबार येथील राजपूत दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची 2 मुलं बचावली आहेत.

author img

By

Published : Feb 6, 2020, 12:06 PM IST

couple dies in Accident at GuJrat
गुजरातमध्ये कार आणि डंपरची समोरासमोर धडक

नंदुरबार - गुजरात राज्यातील उच्छल-निझर रस्त्यावरील गवाण गावाजवळ कार आणि डंम्परची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये शहादा तालुक्यातील अनरथ येथील 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 बालक बचावले आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांचे 2 पुत्र बचावले आहेत. जखमींना उच्छल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गुजरातमध्ये कार आणि डंपरची समोरासमोर धडक

हेही वाचा - एका रुपयात लग्न; शहाद्यात 26 जोडप्यांचा सामूदायिक विवाह

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी शहादा तालुक्यातील अनरथ येथील राजपूत परिवार गुजरात राज्यातील वापी येथून गावी परतत होते. त्यावेळी गवाण गावाजवळ डंम्परची आणि राजपूत यांच्या कारची (एम.एच.39 जे.1412) धडक झाली. यामध्ये योगेंद्रसिंग राजपूत आणि त्यांच्या पत्नी गायत्री राजपूत यांचा मृत्यू झाला आहे. तर निलमकुमार राजपूत आणि मयंककुमार राजपूत ही मुले जखमी झाली आहेत. योगेंद्रसिंग राजपूत हे गुजरात राज्यातील वापी येथे मॅकलोर्ड फार्मासिटी कंपनीत गुणवत्ता विभागात उपव्यवस्थापक म्हणून नोकरीला होते

या अपघाताची उच्छल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून डंपरचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - नवरंग रेल्वेगेट रस्त्यावर ट्रक उलटला; रस्ता दुरवस्थेने लोखंडी सळ्या ठरताहेत जीवघेण्या

Intro:नंदुरबार - शहादा तालुक्यातील अनरद येथील रहिवासी असलेले राजपूत कुटूंबिय गुजरात राज्यातील वापीला कारने जात होते. यावेळी भरधाव डंपरने धडक दिल्यामुळे कार व डंपरचा समोरासमोर भीषण अपघात उच्छल-निझर रस्त्यावर गवाण गावाजवळ काल सकाळी घडला. या अपघातात कार डंपरखाली दबली गेल्याने पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुदैवाने कारमध्ये बसलेली दोन्ही बालके बचावली असून किरकोळ जखमी झाले आहेत. भीषण अपघातात माता-पित्याचा मृत्यू झाल्याने बालकांचे पितृछत्र हरपले आहे. या घटनेची वार्ता अनरद येथे येवुन पोहोचताच गावासह राजपूत समाजात शोककळा पसरली.Body:शहादा तालुक्यातील अनरद येथील मुळ रहिवासी असलेले योगेंद्रसिंग राजपूत हे गुजरात राज्यातील वापी येथे मॅकलोर्ड फार्मासिटी कंपनीत गुणवत्ता विभागात उपव्यवस्थापक म्हणुन नोकरीला होते. योगेंद्रसिंग राजपूत हे आपल्या पत्नी व मुलांना घेवुन अनरद गावी आले होते. काल बुधवारी हे कुटूंबिय अनरदहुन वापीला परतीच्या प्रवासाला स्वतःच्या कारने (क्र.एम.एच.39 जे.1412) सकाळी 6.45 वाजेदरम्यान निघाले. गुजरात राज्यातील उच्छल-निझर रस्त्याने राजपूत कुटूंबिय जात होते. या गाडीत योगेंद्र राजपूत व त्यांची पत्नी, दोन मुली होती. उच्छल ते निझर रस्त्याने जात असतांना गवाण गावाजवळ त्यांची कार व भरधाव वेगात येणार्‍या डंपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कार डंपरखाली दाबली गेली. या भीषण अपघातात कारच्या पुढे बसलेले योगेंद्रसिंग राजपूत व त्यांची पत्नी गायत्री योगेंद्रसिंग राजपूत या दोन्ही पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुदैवाने कारच्या मागील सिटवर बसलेले निलमकुमार योगेंद्रसिंग राजपूत, मयंककुमार योगेंद्रसिंग राजपूत ही दोन्ही बालके बचावली असून किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात घडताच डंपरचालक पसार झाला. परिसरातील नागरिकांनी अपघाताच्या घटनास्थळी लागलीच धाव घेत डंपरच्या खाली दबलेल्या कारमध्ये अडकलेल्या मयत राजपूत दाम्पत्याला बाहेर काढणे अवघड झाले होते. तर जखमी अवस्थेत असलेल्या दोन्ही बालकांना नागरिकांनी गाडीच्या काचा फोडुन सुखरुप बाहेर काढले आहे. त्यामुळे सुदैवाने निलमकुमार राजपूत व मयंककुमार राजपूत ही दोन्ही बालके बचावली असली तरी मात्र त्यांचे मातृ-पितृछत्र भीषण अपघातामुळे हरपले गेले आहे. परिसरातील नागरिकांनी मयत योगेंद्रसिंग राजपूत यांच्या खिश्यातील ओळखपत्रावरील संपर्क क्रमांकावर सदर घटनेची माहिती कळविली. अपघातस्थळी निलमकुमार या मुलाने हंबरडा फोडुन माझे आई-बाबा कुठे आहे? अशी हार्तहाक दिली. तर जखमी मुलांना नागरिकांनी उच्छल सरकारी रूग्णालयात दाखल केले. या भीषण अपघाताची वार्ता अनरद गावी येवुन धडकताच गावासह राजपूत समाजात शोककळा पसरली. योगेंद्रसिंग राजपूत हे मनमिळावु स्वभावाचे होते. तसेच गुजरातच्या मॅकलॉर्ड या फार्मसिटी कंपनीत गुणवत्ता विभागात उपव्यवस्थापक म्हणुन ते कर्तव्य बजवित होते. या अपघाताची उच्छल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून डंपरचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.