ETV Bharat / state

नंदूरबारमध्ये कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; शल्य चिकित्सकांनी घेतली पहिली लस

नंदूरबारमध्ये आज कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांसह इतर आरोग्य सेवकांना यावेळी लस देण्यात आली. तसेच लसीकरण झाल्यानंतर पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी लसीकरण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

corona vaccination start in nandurbar
नंदूरबारमध्ये कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; शल्य चिकित्सकांनी घेतली पहिली लस
author img

By

Published : Jan 16, 2021, 8:19 PM IST

नंदूरबार - आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि आरोग्य कर्मचारी निलीमा वळवी यांनी पहिली लस घेतली. तसेच यावेळी राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचीही उपस्थिती होती.

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

ऐतिहासिक क्षणाचा भागीदार -

देशाच्यादृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोनाच्या संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या सहायाने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यानंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतली पहिली लस -

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी पहिली लस घेऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढावे तसेच त्यांच्या मनातली भीती दूर व्हावी, याकरिता त्यांनी स्वतःची निवड करून घेतली.

आरोग्य सेविकेने घेतली लस -

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महिला आरोग्य सेविका आहेत. महिलांमधील लसीकरणाबाबतची भीती दूर व्हावी, यासाठी मी ही लस घेतली असल्याचे मत आरोग्य सेविका नीलिमा वळवी यांनी व्यक्त केले.

लसीकरणानंतर मार्गदर्शक सूचना -

लसीकरण झाल्यानंतर कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राला कर्मचाऱ्यांनी फुले आणि रंगीत फुग्यांनी सजविले होते. को-विन ॲपवरील नोंदणीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना लस देण्यात येत आली. लसीकरणानंतर ॲपवर लसीकरण झाल्याची नोंद देखील घेण्यात आली. लसीकरणानंतर कर्मचाऱ्यांना 30 मिनीटे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. पालकमंत्र्यांनी प्रतिक्षा कक्षातील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी निरीक्षण कक्षात लसीकरण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवादही साधला.

जिल्ह्यात चार लसीकरण केंद्र -

जिल्हा रुग्णालयासह अक्कलकुवा आणि म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही लसीकरणाला सुरुवात झाली. या चारही केंद्रावर दररोज 100 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अक्कलकुवा येथे 75 कुप्या (750 डोस), म्हसावद 170 (1700 डोस), नवापूर 85 (850 डोस) आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीच्या 120 कुप्या (1200 डोस) शितपेटीत ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - सोलापुरात कंटेनरने तिघांना चिरडले, पुण्याच्या संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.