नंदुरबार - केंद्र शासनाने शेतकरी व कामगार विरोधी कायदे केलेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी नंदुरबारमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्याच बरोबर माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या उपस्थितीत जळगाव येथे भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.
शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळून केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाविरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. शहरातील महाराणा प्रताप पुतळा, बसस्थानक, नेहरु चौक, नगरपालिका, आमदार कार्यालय, दीनदयाल चौक, स्टेट बँकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर याठिकाणी ट्रॅक्टर रॅलीचा समारोप झाला. केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी व कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ रॅली काढली. या रॅलीत शासनाच्या नियमांचे पालन करून तोंडाला मास्क रुमाल बांधून पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीत जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी, आ. शिरीषकुमार नाईक, जि.प.अध्यक्षा अॅड. सिमा वळवी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, योगेश चौधरी, नरेश पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. या रॅलीत सुमारे 300 पेक्षा अधिक ट्रॅक्टर सहभागी झाल्याने रॅलीची मोठी रांग लागली होती.
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील हरणखुरी पेट्रोल पंपपासून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. धडगाव मेन रोड व बाजारपेठेतून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी व कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ रॅली काढली. या रॅलीत शासनाच्या नियमांचे पालन करून तोंडाला मास्क रुमाल बांधून पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ट्रॅक्टर रॅली आठवडे बाजार असल्याने एक वेगळे आकर्षण ठरली.
जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. के. सी. पाडवी यांच्या व जिल्ह्याचे प्रभारी पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच जिल्हा परिषदेचे सभापती रतन पाडवी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेहज्या पावरा, जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष विक्रम पाडवी, हारसिंग पावरा, जामसिंग पराडके, खेमा पराडके, सुनील पाडवी, श्रीमती विजयाताई पावरा, कालूसिंग पाडवी, जिल्हा परिषद सदस्य रुपसिंग तडवी, जाण्या पाडवी, श्रीमती संगीता पावरा, पंचायत समिती सदस्य अॅड गीता पाडवी, विलास पाडवी, ठाणसिंग पावरा, गोविंद पाडवी नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रॅक्टर रॅली मेन रोड मार्गे तहसील कार्यालयात आल्यानंतर समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी, विक्रम पावरा, हारसिंग पावरा यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका अध्यक्ष रहेज्या पावरा यांनी आभार मानले यावेळी असंख्य ट्रॅक्टर घेऊन रॅली काढण्यात आली होती.