नंदुरबार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सातपुड्याच्या दौऱ्यावर आले आहे. अतिदुर्गम भागातील मोलगी, धडगाव या उपकेंद्रावर जाऊन लसीकरणाचा आढावा घेतला तर आरोग्याच्या समस्यांवर नागरिकांशी संवाद साधला. सातपुड्यातील आदिवासी अनेक खडतर परिस्थितीचा सामना करत असतो. अशा वेळी आरोग्याची मुख्य समस्या आहे. ती सोडवण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत असून लवकरच सर्व समस्या मिटतील, असे आश्वासन नागरिकांशी संवाद साधतांना दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली लसीकरण केंद्राला भेट-
सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या द्वारे सातपुडा दुर्गम भागातील मोलगी व धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण व पोषण पुनर्वसन केंद्राची पाहणी नंतर धडगाव तालुक्यातील सुरवाणी येथील वीज उपकेंद्राची पाहणी देखील करणार आहे. त्याचबरोबर कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह धडगाव येथील कृषी विभागाच्या फळ रोपवाटिकेची पाहणी करण्याच्या नियोजित दौरा आहे. परंतु जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे याबाबत सांशकता व्यक्त करण्यात येत असली तरी जिल्हा प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी तयारीत आहे.