ETV Bharat / state

दत्त जयंतीनिमित्त सारंगखेड्यात चेतक फेस्टिवलला सुरुवात; भाविकांची गर्दी

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे श्रीदत्त जयंतीनिमित्त देशातील सर्वात जुना घोडे बाजार भरतो. याठिकाणी गेल्या ३०० वर्षांपासून घोडे बाजार भरत आहे. याठिकाणी अध्यात्म आणि जातिवंत अश्वांचा पर्वणीचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो. एकीकडे याठिकाणी एकमुखी श्रीदत्ताचे मंदिर असल्यामुळे दरवर्षी सारंगखेड्यात यात्रोत्सव साजरा केला जातो.

nandurbar
श्री दत्त जयंती यात्रा
author img

By

Published : Dec 11, 2019, 7:15 PM IST

नंदुरबार - देशातील सर्वात जुन्या अश्व बाजाराला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सुरुवात झाली आहे. हा यात्रोत्सवास दत्त जयंतीला मोठ्या थाटात सुरू झाला. देशातील अश्वप्रेमी या अश्व यात्रेची आतुरतेने वाट पाहतात. गेल्या ३०० वर्षांची परंपरा असलेला हा घोडे बाजार दरवर्षी रुबाबदार घोड्यांमुळे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालतो आहे. या यात्रेतील 'चेतक फेस्टिवल'ला 3 वर्षापासून सरकार मदत करीत होते. मात्र, यावर्षी सरकारने मदत दिली नसल्याने लोकसहभागातून चेतक फेस्टिवलचे मोठ्या उत्सहात आयोजन केले जात आहे.

nandurbar
श्री दत्त जयंती यात्रा

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे श्रीदत्त जयंतीनिमित्त देशातील सर्वात जुना घोडे बाजार भरतो. याठिकाणी गेल्या ३०० वर्षांपासून घोडे बाजार भरत आहे. याठिकाणी अध्यात्म आणि जातिवंत अश्वांचा पर्वणीचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो. एकीकडे याठिकाणी एकमुखी श्रीदत्ताचे मंदिर असल्यामुळे दरवर्षी सारंगखेड्यात यात्रोत्सव साजरा केला जातो. तर, दुसरीकडे देश विदेशातील अश्वप्रेमींना येथे भरणारा घोड्यांचा बाजार खुणावत असतो. या अनोख्या यात्रोत्सवात दरवर्षी ८ ते १० लाख भाविक श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी येतात. या सर्व भाविकांना श्री दत्त दर्शनासोबत ओढ लागलेली असते ती येथे भरणाऱ्या जागतिक दर्जाच्या घोडे बाजाराची. देशातील अश्वप्रेमी या यात्रेची आतुरतेने वाट पाहतात. तर, जगाच्या कान्या कोपऱ्यातून अश्वप्रेमी या घोड्याच्या बाजाराला भेट देतात आणि घोड्यांची खरेदी विक्री करतात.

श्री दत्त जयंती यात्रा

यावर्षी हा घोडे बाजार आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचा प्रयत्न करण्या आला आहे. यावर्षी लोकसभागातून होत असणारा चेतक फेस्टिवल डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक सरंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला भेट देत असतात. लहान वयाच्या घोड्यापासून तर पूर्ण वाढ झालेले घोडे येथे सहज मिळतात. याठिकाणी येणाऱ्या घोड्यांचा रुबाब, त्याची चाल आणि त्याचे गुण वैशिष्ट्य येथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे करते.

हेही वाचा - शेलकुवा गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन; १५ वर्षांपासून मिळत नव्हते रेशन

या घोडे बाजारात पंजाब, हरियाणा, कच्छ , काठीयावाड, उत्तर प्रदेशातून तसेच राज्यातील मोठे घोडे व्यापारी आणि अश्वशौकीन आपले घोडे आणतात. अनेक अश्वप्रेमी तर घोड्याला लोकांनी दाद द्यावी, यासाठी आपले अश्व या यात्रेत आणतात. सुरक्षित वातावरण, उज्वल परंपरा आणि घोडी खरेदीसाठी येणाऱ्या चाहत्यांची संख्या येथे मोठी असल्याने अश्व व्यापारीही या यात्रेत हिरहिरीने सहभाग नोंदवतात.

अश्व प्रेमींसाठी पर्वणी असलेल्या या यात्रेत आपल्या कुटुंबासोबत यावे आणि भारावून जावे असे चित्र या यात्रेचे असते. एका पेक्षा एक उत्कृष्ठ घोडे आपल्या डोळ्यांचे पारणे तर फेडतातच सोबत घोड्यांविषयी आपल्या ज्ञानातही भर घालतात.
हेही वाचा - भाजपतर्फे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी

Intro:नंदुरबार - देशातील सर्वात जुन्या अश्व बाजाराला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सुरुवात झाली आहे. हा यात्रोत्सवास दत्त जयंतीला मोठ्या थाटात सुरु झाला. देशातील अश्वप्रेमी या अश्व यात्रेची आतुरतेने वाट पाहतात. गेल्या 3०० वर्षांची परंपरा असलेला हा घोडे बाजार दरवर्षी रुबाबदार घोड्यांमुळे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालतो आहे. या यात्रेतील चेतक फेस्टिव्हल ला तीन वर्षापासून सरकार मदत करीत होते. मात्र या वर्षी सरकारने मदत दिली नसल्याने लोकसहभागातून चेतक फेस्टिवल मोठ्या उत्सहात होत आहे.
Body:मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे श्रीदत्त जयंती निमित्त देशातील सर्व्यात जुन्या घोडे बाजार भरतो. याठिकाणी गेल्या तीनशे वर्षापासून घोडे बाजार भरत आहे. याठिकाणी अध्यात्म आणि जातिवंत अश्वाचा पर्वणीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. एकीकडे याठिकाणी एकमुखी श्रीदत्ताचे मंदिर असल्यामुळे दरवषी सारंगखेड्यात यात्रोत्सव साजरा केला जातो तर दुसरीकडे देश विदेशातील अश्व प्रेमीना येथे भरणाऱ्या घोड्यांच्या बाजार खुणावत असतो. या अनोख्या यात्रोत्सवात दरवषी आठ ते दहा लाख भाविक श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी येतात. या सर्व भाविकांना श्री दत्त दर्शनासोबत ओढ लागलेली असते ती येथे भरणाऱ्या जागतिक दर्ज्याच्या घोडे बाजाराची. देशातील अश्व प्रेमी तर या यात्राचे आतुरतेने वाट पाहतात. देशातीलच नव्हे तर जगाच्या कान्या कोपऱ्यातून अश्व प्रेमी या घोड्याच्या बाजाराला भेट देतात आणि घोड्याची खरेदी विक्री करतात.

या वर्षी हा घोडे बाजार आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. या वर्षी लोकसभागातून होत असणारा चेतक फेस्टिव्हल डोळ्याचे पारणे फेडणार हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक सरंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल भेट देतात. लहान वयाच्या घोड्यापासून तर पूर्ण वाढ झालेल्या घोड्यापर्यंत घोडे येथे सहज मिळतात. याठिकाणी येणाऱ्या घोड्यांचा रुबाब, त्याची चाल आणि त्याचे गुण वैशिष्ठ येथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलास करतात.

या घोडे बाजारात पंजाब, हरियाना, कच्छ , काठीयावाड, उत्तर प्रदेश तसेच राज्यातील मोठे घोडे व्यापारी आणि अश्व शौकीन आपले घोडे येथे आणतात. अनेक अश्व प्रेमी तर घोड्याला लोकांनी दाद द्यावी. यासाठी आपले अश्व या यात्रते आणतात. सुरक्षित वातावरण, उज्वल परंपरा आणि घोडी खरेदीसाठी येणाऱ्या चाहत्याची सख्या येथे मोठी असल्याने अश्व व्यापारीही या यात्रेत हिरहिरीने सहभाग नोंदवतात.

Bytes - भावीकConclusion:अश्व प्रेमींसाठी पर्वणी असलेल्या या यात्रेत आपण आपल्या कुटुंबासोबत यावे आणि भारावून जावे असे एक से बढकर एक घोडी आपल्या डोळ्यांचे पारणे तर फेडतीलच सोबत घोड्यान विषयी आपल्या ज्ञानातही भर घालतील.

Bytes - भावीक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.