नंदुरबार - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून मुख्यमंत्री पदाच्या कोषातून बाहेर पडले नसल्याचे शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी फडणवीसांवर टीका केली. भुसे हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आज (शनिवारी) धडगाव तालुक्यात होते.
हेही वाचा - शिवसेनेला मोठा धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
शिवसेनाचा कोणताही नेता किंवा आमदार पक्ष सोडून जाणार नाही आमच्यात काही विसावंद असेल तर बसून सर्व प्रश्न सुटतील, मात्र आमच्यापैकी कुणी पक्ष सोडणार नसल्याचे प्रतिपादनही भुसे यांनी यावेळी केले. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
"शिवथाळी अजून सुरु झालेली नाही तीला प्रायोगिक तत्वावर सुरू करणार आहोत. अजून, योजना सुरू पण झाली नाही तोपर्यंत आरोप करण्यास सुरवात केली आहे. या योजनेत काही बदल करायचे असतील तर त्यांनी सुचवावेत. सत्ता गेल्याने फडणवीस आणि भाजप हादरली आहे. त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टी दिसत नाहीत." असा घणाघातही भुसे यांनी यावेळी केला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने सेनेच्या हातात सत्ता द्यावी आम्ही दुर्गम भागात विकास पोहचवण्यासाठी कटिबंध असल्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.
हेही वाचा - आरोग्याला अपायकारक अन्नपदार्थांवर अधिक कर हवा- सौम्या स्वामीनाथन