ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये बीएसएनएलची सेवा कोलमडल्याने ग्राहकांचे हाल - नंदुरबार बीएसएनएल सेवा कोलमडली

नंदुरबारमध्ये धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएलची सेवा पुन्हा कोलमडली आहे. दोन महिन्यांपासून या विभागातील वीज वितरण कंपनीचे साधारण साडेचार लाख रुपयाचे वीजबिल थकीत आहे.

नेटवर्क नसलेला मोबाईल फोन
author img

By

Published : Nov 2, 2019, 6:58 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएलची सेवा वारंवार कोलमडत असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपासून या विभागातील वीज वितरण कंपनीचे साधारण साडेचार लाख रुपयाचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे टेलिफोन सेवा खंडित आहे.

बीएसएनएलची सेवा कोलमडल्याने ग्राहकांचे हाल

दूरसंचार विभाग आणि महावितरण कंपनी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर थकीत रक्कम जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, बीएसएनएलने दिलेल्या मुदतीत वीज बिल न भरल्याने सातपुड्याच्या दुर्गम भागातील आठ मोबाईल टॉवरची विजजोडणी खंडित करण्यात आली आहे. यामुळे या भागातील सुमारे 60 हजार ग्राहक प्रभावित झाले आहेत.

हेही वाचा - अवकाळी पावसाने शेती 'पाण्यात'; गिरणा धरणातून विसर्ग सुरू

यामुळे या परिसरातील विविध बँका, मिनीबँक, शासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अगोदरच दुर्गम असलेला हा भाग संपर्क सेवा कोलमडल्याने आणखी अडचणीत आला आहे. लवकरात लवकर बीएसएनएलची सेवा कार्यान्वित करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

Intro:नंदुरबार - धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएलची सेवा वारंवार कोलमडत असल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत दोन महिन्यापूर्वी या विभागाकडे वीज वितरण कंपनीचे साधारण साडेचार लाख रुपयाचे वीजबिल थकीत होते त्यामुळे टेलिफोन सेवा खंडित झाली होती.Body:दूरसंचार विभाग आणि महावितरण कंपनी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर थकीत रकमेच्या वसुलीला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र बीएसएनएल ने दिलेल्या मुदतीत वीज बिल न भरल्याने सातपुड्याचा दुर्गम भागातील आठ मोबाईल टॉवर ची विजजोडणी खंडित करण्यात आल्याने जवळपास 60 हजार ग्राहक प्रभावित झाले आहेत. यामुळे या परिसरातील विविध बँका मिनिबँक शासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्वरित ही सेवा कार्यान्वित करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.