ETV Bharat / state

'आधी लगीन  पाण्याचे मग माझे',  महिला सरपंचाने गावाला पाणीदार करण्याचा केला निर्धार - सरपंच

अल्का पवार निवडुन आल्यानंतर गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार तिने केला आहे. गावातील पाण्याची समस्या सोडवल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

मुलांसोबत श्रमदानाला जाताना सरपंच अल्का निलसिंग पवार
author img

By

Published : May 20, 2019, 10:36 PM IST

Updated : May 24, 2019, 9:20 PM IST

नंदुरबार- 'आधी लगीन पाण्याचे, मग माझे' असे म्हणत शहादा तालुक्यातील विरपूर येथील महिला सरपंच अल्का निलसिंग पवार यांचा अनोखा उपक्रम संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधुन घेत आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेल्या आणि आदिवासी बहुल वस्ती असलेल्या या गावातील पाणी समस्या कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी महिला सरपंचाने पुढाकार घेतला आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत गावातीलच नागरीकांनी अल्का निलसिंग पवार या सुशिक्षीत तरुणीला उभे करुन निवडुन आणले. अल्का हिने इयत्ता अकरावी, बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथे पुर्ण केले. नर्सिंगचे शिक्षण नगर जिल्ह्यातील कोरपेवाडी येथे पुर्ण केले. या शिक्षणाचा फायदा तिने गावकऱ्यांसाठी व गावाच्या विकासासाठी करण्याचे ठरविले आहे.

अल्का पवार निवडुन आल्यानंतर गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार तिने केला आहे.

अल्का पवार निवडुन आल्यानंतर गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार तिने केला. गावाला पाणीपुरवठा करणाऱया दोनशे फूट खोल बोअरची दुष्काळात पाणी पातळी खालवल्याण्यानंतर पाईप वाढवुन ती पुन्हा सुरू करण्यात आली. गावात पाच हँड पंप असून त्यापैकी एक बंद झाला आहे. तर बाकीच्या हँडपंपांमधून कमी पाणी येते. हे लक्षात आल्यावर अल्काने गावाजवळ असलेल्या नाल्यात गावकऱ्यांच्या मदतीने विहिर खोदली व तिला पाणी देखील लागले. पाणी फाउंडेशनच्या उपक्रमातगी गावाने सहभागी होण्याचे ठरविले.

गावात बैठक घेऊन गावकरी, शाळकरी मुले मुली यांच्या सहकार्याने दोनशे सहा हेक्टर डोंगराळ भागात सीसीटी प्रकाराचे खड्डे तयार करण्यास सुरुवात केली. 'पाणी अडवा पाणी जिरवा' या संकल्पनेतून पाण्यासाठी संघर्ष चालू केला. गावातील लहान लहान बालके, मुल-मुली व काही स्री-पुरुषांना सोबत घेवुन पंधरा ते वीस जणांचा समुदायाने हे काम सुरू ठेवले आहे. सीसीटी काम सुरू असताना किती तरी वेळा अल्का हिला लग्नासाठी पहाण्यासाठी मुलाकडची मंडळी आली आहे. तुला घरी बोलावले आहे, असा निरोप यायचा तेव्हा ती तेथुनच उत्तर द्यायची 'आधी माझं गाव पाणीदार करेन मग लग्न'.

गावाला सुशिक्षित सरपंच लाभला हे आमचे भाग्य आहे. तिचे चांगले विचार पाहुन आम्हालाही आनंद होतो. असे येथील गावकरी सांगतात. सरपंच अल्का निलसिंग पवार यांच्या पुढाकारतून गावात अनेक विकासकामे सुरू आहेत. गावातील दोनशे सहा हेक्टर परिसरात जनार्थ आदिवासी विकास संस्था व गावकऱ्यांचा सहकार्याने वीस हजार फळ झाडी लावली जात आहेत. पाणी साठवणुकीसाठी कृषी खात्यामार्फत दोन नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे, दगडी बांध हे गावकऱ्यांच्या श्रमदानातुन करण्यात आले.

Feed FTP RMH_20_MAY_NDBR_PANITANCHI_VIS_BYTE

 Anchor :- विरपुर ता. शहादा येथील महिला सरपंच अल्का निलसिंग पवार यांचा अनोखा उपक्रम 'आधी लगीन पाण्याचे' मग माझे असे म्हणत संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधुन घेतले आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेले हे पूर्ण आदिवासी बहुल वस्ती गावातील पाणी समस्या कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी महिला सरपंचने उचलेल पाऊल काय आहे बघूया एक खास रिपोर्ट...

MUSIC MONTAGE

Vo 1 शहादा शहराच्या उत्तरेकडे सातपुड्याच्या पर्वत रांगा जवळ असणाऱ्या साधारण तीस किलोमिटर अंतरावर वसलेलं विरपुर हे गाव. विरपूर गावाची लोकसंख्या दोन हजार तीनशे साठ एवढी आहे. दुष्काळाची तीव्रता या गावालाही झळा देत आहे, लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. संपुर्ण शेती व्यवसाय हा पावसाळ्याचा पाण्यावर अवलंबून आहे. पावसाळा चांगला झाला तर पिक येते. बाकी इतर वेळेस गावातील लोक कापुस वेचणे, केळी, पपई, उस तोड अश्याप्रकारची मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. 

MUSIC MONTAGE

Vo 2 कुठलाही इतिहास घडवायचा असेल तर एखादा अवलिया जन्मावा लागतो. प्रखर विचारसरणी व वागणूक असावी लागते. डिसेंबर महिन्यात झालेल्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत गावातीलच नागरीकानी अल्का निलसिंग पवार या सुशिक्षीत तरुणीला उभे करुन निवडुन आणले. अल्का हीने इयत्ता अकरावी, बारावी सायंसचे शिक्षण वसंतराव नाइक उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथे पुर्ण करुन नर्सिंग चे शिक्षण नगर जिल्ह्यातील कोरपेवाडी येथे पुर्ण केले. व हा शिक्षणाचा फायदा तीने गावकऱ्यांसाठी व तिचा गावाचा विकासासाठी करावा असे ठरविले आहे. ती निवडुन आल्यानंतर लागलीच पाणी टंचाई हा प्रश्न तिला भेडसावु लागला. गावातील पाणी पुरवठा होत असलेली बोअरवेल जी दोनशे फुट खोल होती. दुष्काळात पाणी पातळी खालवाल्याने पुन्हा पाईप वाढवुन सुरु करण्यात आली मात्र गावकऱ्यांची तहान भागात नव्हती गावात पाच हॅंड पंप आहे, त्यापैकी एक बंद झाले आहे तर बाकीचे हॅंड्पंप यांना देखील भरपुर हापसावे लागते तेव्हा बराच वेळाने हंडा भरतो हे लक्षात आल्यावर गावा जवळ असलेल्या नाल्यात तीने गावकऱ्यांच्या मदतीने विहिर खोदली व तिला पाणी देखील लागले. पण एवढ्यावरच न थांबता तीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी फाउंडेशन या उपक्रमात सहभागी होण्याचे ठरविले.

Byte :- महिला सरपंच अल्का निलसिंग पवार

Vo 3 गावात मिटींग घेऊन गावकरी शाळकरी मुले मुली यांच्या सहकार्याने दोनशे सहा हेक्टर या डोंगराळ भागात सी सी टी प्रकाराचे खड्डे तयार करण्यास सुरुवात केली. पाणी अडवा पाणी जिरवा या सकल्पनेतून पाण्यासाठी सघर्ष चालू केला या कामात गावातील लोक साथ देत नाही. यावर ती थांबली नाही तर जो येइल त्याचा सोबत जो येणार नाही त्याचा विना काम सुरु केले. गावातील लहान लहान बालक , मुल मुली व काही स्री पुरुष सोबत घेवुन पंधरा ते वीस जणांचा समुदायाने काम सुरु ठेवले आहे.

Byte :- महिला सरपंच अल्का निलसिंग पवार
Byte :- गावकरी 

 Vo 4 सी सी टी काम सुरु असते वेळी किती तरी वेळा महिला सरपंच अल्का निलसिंग पवार लग्नासाठी पहाण्यासाठी मुलाकडची मंडळी आली आहे तुला घरी बोलावले आहे असा निरोप यायचा तेव्हा ती तेथुनच उत्तर द्यायची आधी माझ गाव पाणीदार करेन मग लग्न.

Byte :- सरपंच मुलीचे वडील
Byte :- गावकरी

Vo 5  जनतेने मला निवडुन दिले आहे. वडील आदिवासी एकता परिषदेचे काम करतात. त्यांचे प्रोत्साहन मिळाले. आम्ही तीन बहिणी आहोत माझ विरपुर गाव पाणीदार व्हावे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवुन काम करते आहे. आधी लगीन गावात पाणी आणण्याचे ( गाव पाणीदार ) नंतर माझे ...
 गावाला सुशिक्षित सरपंच लाभला हे आमचे भाग्य आहे. तीचे चांगले विचार पाहुन आम्हाला ही आनंद होतो. श्रमदानासाठी गावातील लोक स्वतः हुन तयार होत नाही त्याना मजुरी हवी असते. पण हा त्यांचा दोष नाही मजुरी मिळाली तर पोटाची खळगी भरेल नाही तर मग उपाशी रहावे लागेल .. 

Byte :- करमसिंग अत्तारसिंग पवार

Vo 6 याच दोनशे सहा हेक्टर परिसरात जनार्थ आदिवासी विकास सस्था परिसर व गावकऱ्यांचा सहकार्याने वीस हजार फळ झाडी लावली जात आहेत विरपुर गृप ग्रामपंचायत असुन त्यात चिचोरा, उनपदेव पाडा, दरा या गावांचा देखील सहभाग आहे. पाणी साठवणुकी साठी कृषी खात्यामार्फत दोन नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे, दगडी बांध हे गावकर्यांचा श्रमदानातुन करण्यात आले. त्यामुळे पाउस भरपुर झाला तर पावसाळ्यात पाणी अडवून पाण्याची पातळी देखील वाढण्यास मदत होणार आहे.

Last Updated : May 24, 2019, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.