ETV Bharat / state

नवापूर; चार पोल्ट्रीमधील पक्षी नष्ट करण्याचे प्रशासनाचे आदेश, व्यावसायिकांनी दिली आत्महत्याची धमकी - चार पोल्ट्रीमध्ये कलिंग ऑपरेशन

जिल्हा प्रशासनाने नवापूर शहरातील उर्वरित चार पोल्ट्रीतील ५१ हजार पक्षी व अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत.

killing operation
killing operation
author img

By

Published : Feb 18, 2021, 3:34 PM IST

Updated : Feb 18, 2021, 4:45 PM IST

नंदुरबार - नवापूर परिसरातील २२ पोल्ट्री फार्मच्या बर्डफ्लुबाधित कोंबड्यांचे कलिंग ऑपरेशनात आतापर्यंत ५ लाख ७८ हजार ८९० पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. एकूण २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट केली. काही दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नवापूर शहरातील उर्वरित चार पोल्ट्रीतील ५१ हजार पक्षी व अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले. मात्र पोल्ट्री फार्म व्यावसायिकांनी आमचे अहवाल निगेटिव्ह असल्यामुळे पक्षांची कलिंग करू नये अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ व न्याय मिळवू नाहीतर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला आहे.

चार पोल्ट्रीमधील पक्षी नष्ट करण्याचे प्रशासनाचे आदेश

औरंगाबाद खंडपीठात जाण्याची संधी द्यावी

जिल्हा प्रशासनाकडून चार पोल्ट्री फार्ममधील 51 हजार कोंबड्यांची कलिंग व अंड्यांसह पशुखाद्य नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर पोल्ट्री फार्म व्यावसायिकांनी या आदेशाला स्थगिती आणण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात जाण्याची पाच दिवसांची सवलत द्यावी अशी मागणी या वेळी पोल्ट्री व्यावसायिकांनी नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्यासमोर केली.

न्याय न मिळाल्यास आत्महत्या शिवाय पर्याय नाही

नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना पोल्ट्री व्यावसायिकांनी निवेदन दिले. चार पोल्ट्री फार्म मध्ये मरतूक नसतांना कलिंग ऑपरेशन करू नये. आधी एक किलोमीटर परिसरातील पक्षी नष्ट करण्याचे मार्गदर्शन असतांना अचानक अडीच किलोमीटर अंतरावरील पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याने चारही पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. जर आमच्या पोल्ट्रीतील कुकुट पक्ष्यांची मरतूक नाही दोन निगेटिव्ह अहवाल असतांना पोल्ट्रीतील पक्षी व अंडी पशुखाद्य नष्ट करणार असणार तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा पोल्टी व्यावसायिकांनी दिला आहे.

केद्र सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाची कारवाई

पशुसंवर्धन विभागाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. नवापूर २२ पोल्ट्रीत बर्ड फ्लूची लागण झाली आहे. त्यावर केंद्र सरकारने जिल्हा प्रशासनाला बर्ड बाधित क्षेत्र एक किलोमीटर ऐवजी अडीच किलोमीटर घेऊन कारवाई करावी असे आदेश प्राप्त झाल्याने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर पोल्ट्रीत व्यवसायिकांना आदेश दिले आहे. चारही पोल्ट्रीतील दोन अहवाल निगेटिव्ह आहेत तिसरा अहवाल आज पाठवण्यात आला आहे लवकरच रिपोर्ट येईल. असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानुसार नंदुरबार जिल्हा प्रशासनाने कारवाईची नियोजन केले आहे.

राज्यात सर्वात मोठे कलिंग ऑपरेशन

राज्यातील सर्वात मोठे कलिंग ऑपरेशन हे नवापुर शहरात आठवडाभरापासून राबविण्यात आले आहे. या चोवीस पोल्ट्रीमध्ये लाखो पक्षी व अंडी नष्ट करण्यात आले आहे. यासाठी नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथील पशुसंवर्धन विभागातील ९५ पथकामार्फत कलिंग ऑपरेशन राबविण्यात आले. साधारणता साडेचारशे ते पाचशे विभागातील कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून नवापूरमध्ये मुक्कामी होते.

अशी आहे चार पोल्ट्री फार्मची आकडेवारी

नवापूर शहरातील चार पोल्ट्रीतील पक्ष्यांचे अंडी नष्ट करण्याचे काम पुढील आदेश आल्यानंतर करण्यात येणार आहे. यामध्ये पेरानीयार पोल्ट्री २८ हजार, पक्षी, पॅराडाईज ४ हजार ६०० पक्षी, रीची ६ हजार ५०० पक्षी, अशरफ पोल्ट्री १२ हजार पक्षी या चार पोल्ट्रीमधील एकूण ५१ हजार १०० कुकुट पक्षी व अंडी व नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नवापूर तहसील कार्यालयात पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. यात एक किलोमीटर ऐवजी अडीच किलोमीटर अंतर निश्चित केल्याने चार पोल्ट्रीमधील कुकुट पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. दोन वेळा कुकुट पक्षीचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तिसरा अहवाल घेण्यात आला आहे. अहवाल निगेटिव्ह असताना कुकुट पक्षी नष्ट करण्याचा अट्टहास का करण्यात येत आहे असा सवाल त्यांनी तहसील कार्यालयात उपस्थित केला आमचे पक्षी नष्ट केले तर आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली.

Last Updated : Feb 18, 2021, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.