ETV Bharat / state

जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी; ८० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण, काही तासातच मृत्यू

शहरातील एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही तासातच ही महिला दगावली. महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत सदर भागात बॅरिकेटींग करुन जंतूनाशक फवारणी केली आहे.

author img

By

Published : May 9, 2020, 10:33 AM IST

Corona positive
कोरोना पॉझिटिव्ह

नंदुरबार - चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या रूग्णाच्या कुटुंबासह बरा होवून घरी परतल्याने नंदुरबार शहर कोरोनामुक्त झाल्याचा आनंद होता. मात्र, हा आनंद केवळ दोनच दिवस टिकला. शहरातील एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही तासाच ही महिला दगावली. महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत सदर भागात बॅरिकेटींग करुन जंतूनाशक फवारणी केली आहे.

मृत महिलेच्या रहिवासी भागात बॅरिकेटींग करुन जंतूनाशक फवारणी केली

नंदुरबार जिल्ह्यात 17 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. या रूग्णाच्या कुटूंबातील अन्य तिघांनाही लागण झाली होती. त्या पाठोपाठ शहाद्यातील एका युवकाचा कोरोनामुळे बळी गेला. नंदुरबार शहरात आढळून आलेल्या पहिल्या रूग्णासह कुटूंबातील तिघांचीही प्रकृती सुधारल्याने ते बरे होवून चार दिवसांपूर्वीच घरी परतले. त्यामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, गुरुवाती रात्री अहिल्याबाई विहीर भागात राहणार्‍या एका 80 वर्षीय वृद्धेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.

वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त होताच प्रशासनाने खबरदारी घेत खासगी रूग्णालय सील करत डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना क्वॉरंटाईन केले. सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, पालिका मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड यांनी अहिल्याबाई विहीर परिसरात भेट देवुन परिसराची पाहणी केली.

हा परिसर सील केला असून बाधित वृद्धेच्या कुटूंबातील 5 जणांना जिल्हा रूग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले. जिल्ह्यात आता पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 21 झाली आहे. त्यापैकी पाच जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर 14 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.