नंदुरबार - जिल्ह्यात आणखी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 8 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 60जण संसर्गमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात 97 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्हा प्रशासनाला काल 33 अहवाल प्राप्त झाले होते. सर्व अहवाल मोलगी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिसांचे आहेत. यापूर्वी मोलगी येथे कोरोना रुग्ण आढळले होते. यामुळे परिसरात कोरोना विषाणूचे संक्रमण झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शुक्रवारी तीन पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी मोलगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उर्वरित 30 अहवाल निगेटिव्ह आले असून त्यात मोलगी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश आहे.
कोरोनावर 8 जणांनी मात केली असून त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एकूण 60 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 157 रुग्ण असून त्यात 97 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.