नंदुरबार: राज्यात मिरची उत्पादनात अग्रेसर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच परतीच्या पावसाने मोठा झटका दिला आहे. Nandurbar Rain हंगाम सुरू होऊन काही दिवस झाले असतानाच परतीच्या पावसामुळे सुमारे २० ते २२ हजार क्विंटल मिरचीचे नुकसान झाले असून दीड ते दोन कोटींचा आर्थिक फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. यंदा मिरचीचे भाव गगनाला पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
जिल्ह्यात 15 दिवसांपासून परतीच्या पावसाचा मुक्काम नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस मुसळधार पडत आहे. सुरुवातीला आलेल्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, बाजरी व ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या मुसळधार पावसाने लाल मिरचीलाच रडवून सोडले आहे. नंदुरबार बाजारपेठ ही मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. नंदुरबारच्या मिरचीची देशभरासह परदेशात सुद्धा मागणी आहे. मिरचीचा हंगाम सुरु झाला असतांना पावसाने झोपडल्याने व्यापाऱ्यांनी शहराला लागून असलेल्या पथारीवर मिरची वाळविण्यासाठी टाकली होती.
परवाच्या रात्री झालेल्या पावसाने सुमारे २० ते २२ हजार क्विंटल मिरचीचे नुकसान केले आहे. व्यापाऱ्यांना दिड ते 2 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आतापर्यंत २५ हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली. अचानक आलेल्या पावसाने व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. २० हजार क्विंटलपेक्षा जादा मिरची पावसाच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान झाले आहे .
2 कोटींचे मिरची व्यापाऱ्यांचे नुकसान दीड ते दोन कोटींचे नुकसान नंदुरबार परिसरात झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचे 2 कोटींचे नुकसान झाले आहे. नंदुरबार बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांकडून २५ हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली होती. सदर मिरची वाळविण्यासाठी टाकली असता अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.