नंदुरबार - जिल्ह्यात बुधवारी (29जुलै) 19 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बधितांचा एकूण आकडा 534 वर पोहोचला आहे, तर एकाचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी सात जण संसर्गमुक्त झाले. त्यामुळे एकून कोरोनामुक्तांची संख्या 337 वर पोहोचली आहे. 29 जणांचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, करजकुपा व दहिंदुले या तीन गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. शनिमांडळला 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे.
नंदुरबार येथील वीरसावरकर नगरातील 64 वर्षीय पुरूष उपचारासाठी 21 जुलैला जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचार सुरू होते. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नाशिकला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
बुधवारी प्राप्त अहवालानुसार नंदुरबार शहरातील नागाई नगरात 27 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, 74 वर्षीय वृद्ध महिला, 49 वर्षीय पुरूष, रघुकुल नगरात 73 वर्षीय महिला, मंगलमूर्ती नगरात 42 वर्षीय पुरूष, 16 वर्षीय युवक, साक्रीनाका भागात 30 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय पुरूष, नवी सिंधी कॉलनीत 30 वर्षीय महिला व नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे 46 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय पुरूष, करजकुपे येथे 52 वर्षीय पुरूष, दहिंदुले येथे 60 वर्षीय महिला तर शहादा येथील हरीओम नगरात 54 वर्षीय पुरूष, भावसार मढीत 28 वर्षीय पुरूष, गरीब नवाज कॉलनीत 65 वर्षीय महिला, असे 19 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.
दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील खोक्राळे येथील एका 35 वर्षीय पुरूषाला आयसीएमआय पोर्टलवरुन नंदुरबार येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.