नंदुरबार - महाराष्ट्रातून गुजरात राज्यात अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणारा मद्यसाठा राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर विसरवाडी पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान दोघांना अटक करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठाची किंमत 18 लाख आहे.
गुप्त माहितीच्या आधारे विसरवाडी पोलिसांना केली कारवाई
मध्यप्रदेश राज्यातून गुजरात राज्यात महाराष्ट्र मार्गे अवैधरित्या ट्रक क्र. (MH-19-CY-2403) द्वारे विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, विसरवाडी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.सहावरील महालक्ष्मी हॉटेलसमोर नाकाबंदी करत ट्रकची चौकशी केली. या ट्रकमध्ये मक्याच्या गोणी भरलेल्या होत्या. मात्र अधिक चौकशी केली असता, मध्यप्रदेश राज्यात विक्रीसाठी परवाना असलेल्या पावर टेन थाऊजंड सुपर स्ट्रॉंग बियरचे 445 बॉक्स आढळून आले. तसेच ट्रकचालकाकडे बिअरचे परमिट व दारू वाहतुकीच्या परवाना नसल्यानेही आढळून आले. पोलिसांनी चालक रामकृष्ण पंडित पाटील सहीत त्याचा सहकारी सुनील श्रीराम पाटीलला अटक करून ट्रकमधील 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'या' पथकाने केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार; नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता