नंदुरबार - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा अहवाल पाहता 24 तासात कोरोना पॉझिटीव्ह आढळणाऱ्यांची संख्या शंभर झाली आहे. रविवारी दिवसभरात 137 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 751 इतकी झाली आहे.
शहरातील परदेशीपुरात 2 व्यक्ती, साईपार्क कोकणीहीलमध्ये 1, रायसिंगपुरात 1, शंकर नगर दुधाळे शिवारात 1, चौधरी गल्लीत 1, जय गुरुदेव नगर कोकणीहीमध्ये 1, अवधुत पार्कमध्ये 1, राजपूत पेट्रोलपंपाजवळ 1, शिवाजी कॉलनी 1, खंडेराव पार्कमध्ये 2, शिंदे नगरात 2, विमल हौसिंग सोसायटीत 2, नंदुरबार तालुक्यातील खामगाव येथे 1, घोटाणे येथे 3, आराळ्यात 2, कोळद्यात 2, रनाळ्यात 2, कोपर्लीत 2, कोठलीत 1, उमर्दे येथे 1, शहादा शहरातील श्यामनगर मोहिदा चौफुली परिसरात 1, स्वामी विवेकानंद नगरात 1, गणेश नगरात 1, मानसविहारात 2, स्विपर कॉलनीत 1, विकास हायस्कूल परिसरात 1, संभाजी नगरात 2, सी.सी.मध्ये 1, सदाशिव नगरात 1, शहादा तालुक्यातील वडाळी येथे 1, पाडळदा येथे 6, शेल्टी येथे 5, लोणखेड्यात 3, देऊळ येथे 1, शिरुड येथे 3, कळंबु येथे 6, अनरद येथे 1, मलोनीत 1, मोहिद्यात 4, वैजालीत 3, डोंगरगाव 4, मंदाण्यात 1, नवापूर शहरातील लाखाणी पार्कमध्ये 2, महाराणा प्रताप चौकात 4, शास्त्री नगरात 2, जुनी पोस्ट गल्लीत 1, महादेव गल्लीत 1, गढी परिसरात 1, जुनी महादेव गल्लीत 1, नवापूर तालुक्यातील फुलफळी येथे 1, बिलमांजर्यात 1, बालाघाटला 1, खांडबार्यातील शिवाजी चौकात 1, तळोदा येथे काकासेठ गल्लीत 1, गुरुकुल कॉलनीत 1, खान्देश गल्लीत 2, विद्यानगरीत 7, धनकवाड्यात 2, विक्रमनगरात 6, मोठा माळीवाड्यात 5, बँक ऑफ बडोदा 1, तळोदा तालुक्यातील तळवे येथे 5, अक्कलकुवा येथील जुना दवाखान्यात 3, अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटीश अंकुशविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 1, दोंडाईचा येथील विद्यानगरात 1, शिंदखेड्यातील लक्ष्मीनारायण नगरात 1 असे एकुण 137 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.
तसेच रविवारी 23 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये नंदुरबार येथील जुनी भोई गल्लीतील 75 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवती, जगताप वाडीतील 65 वर्षीय पुरुष, लहान माळीवाड्यातील 55 वर्षीय महिला, नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथील 10 वर्षीय बालक, 62 वर्षीय महिला, आसाणे येथील 28 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष, कोळदा येथील 70 वर्षीय पुरुष, शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरीतील 55 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, चांदसैली येथील 40 वर्षीय पुरुष, कळंबु येेथील 42 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय युवक, 20 वर्षीय युवक, 38 वर्षीय महिला, निथाणे येथील 60 वर्षीय पुरुष, नवापूरातील जनता पार्क गल्ली नं.1 मध्ये 70 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष असे 23 जणांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2 हजार सातशे एकावण्ण झाली असून त्यापैकी एकूण 1 हजार 290 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तर आतापर्यंत 71 जणांचा मृत्यू झाला आहे.