नंदुरबार - सहा वेळा धडगावचे आमदार म्हणून निवडून आलेले अॅड के सी पाडवी यांनी शक्ती प्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज सोमवारी काँग्रेस पक्षाकडून दाखल केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला गेलेला आहे. मागच्या पंचवार्षिक लढतीत मोदी लाटेमुळे या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला होता. हा गड आम्ही काँग्रेस पक्षात परत खेचून आणू अशी भावना के सी पाडवी यांनी यावेळी व्यक्त केली.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाची ताकद आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या वेळेस ताकद दाखवण्याची गरज नाही 29 एप्रिलला ही ताकत मत पेटी मध्ये बंद करून 23 मेला ती बाहेर काढू असे वक्तव्य पाडवी यांनी केल आहे.