ETV Bharat / state

हंडाभर पाण्यासाठी धोक्यात घालावा लागतोय जीव, नांदेडमध्ये विहिरीत पडून युवक गंभीर जखमी

मुखेड तालुक्यातील होकर्णा येथील एक युवक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून गंभीर जखमी झाला आहे.

author img

By

Published : May 26, 2019, 10:01 AM IST

हंडाभर पाण्यासाठी धोक्यात घालावा लागतोय जीव, नांदेडमध्ये विहिरीत पडून युवक गंभीर जखमी

नांदेड - मुखेड तालुक्यातील होकर्णा येथील एक युवक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून गंभीर जखमी झाला आहे. विहिरीतून पाणी काढताना त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. शाम गंगाधर गवते (वय- 20) असे जखमी युवकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

मुखेड तालुका भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असून ग्रामीण भागात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. शाम गवते विहिरीत पडल्यानंतर त्याला नागरिकांनी बाजेच्या सहाय्याने वर काढले. त्यानंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल करण्यात आले होते. परंतु उपजिल्हा रुग्णालयात अर्धा तास थांबल्यानंतरही वैद्यकिय अधिकारी उपस्थित नसल्याने तरुणाच्या नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

Intro:नांदेड - हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात,
विहिरीत पडून युवक गंभीर.

नांदेड : मुखेड तालुक्यातील होकर्णा येथील शाम गंगाधर गवते वय 20 वर्ष या युवकाचा विहीरीतून पाणी आनताना तोल जाऊन विहीरीत पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 25 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान घडली.Body:मुखेड तालुका भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असुन ग्रामीण भागात मोठी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी आनावे लागत आहे. असाच प्रकार होकर्णा मध्ये घडला दि. 25 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान शाम गवते यांनी पाणी आणण्यासाठी जवळच असलेल्या विहीरीकडे गेले असता अचानक त्यांचा तोल ढासळून विहीरीत पडले. बाजुला असलेल्या नागरीकांनी त्यांना बाजेच्या सहाय्याने वर आणण्यात आले व त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे नेण्यात आले.Conclusion:
मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात अर्धा तास थांबल्यानंतरही कोणताही वैद्यकिय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळाला नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.