ETV Bharat / state

'येथे लघुशंका का करतोस' म्हणत दोघांना जबर मारहाण; एकाचा मृत्यू - naded crime

किरकोळ कारणावरुन नांदेडात एकाचा खून झाला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या २ युवकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Mar 23, 2019, 1:19 PM IST

नांदेड - येथे 'लघुशंका का करतोस' याचा जाब विचारत २ तरुणांना मारहाण झाली होती. यातील एका जखमी युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलम ३०२ ची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या २ युवकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विमानतळ पोलीस ठाणे

धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ६ च्या सुमारास सुमित एकलारे आणि त्याचा मित्र शुभम हे दोघे रेल्वे डिव्हीजन कार्यालयासमोर थांबले होते. त्यावेळी तेथे ४ ते ५ युवक आले. त्यांनी शुभम आणि सुमितला येथे लघुशंका का करता? म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत सुमितच्या छातीवर मार लागला. जखमी अवस्थेत सुमितला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सुमितचे वडील गुरूनाथ विश्वनाथ एकलारे यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सुमित आणि शुभम यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी महम्मद सलमान उल्ला वसीफउल्ला, सय्यद सलमान सय्यद रहिम यांना अटक केली. त्यांचे फोटो दोघांना दाखवले असता सुमितने त्यांना ओळखले. शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान सुमितचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचे कलम वाढविण्याचा अर्ज न्यायालयाला सादर केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सय्यद सलमान सय्यद रहीम आणि महम्म्मद सलमान उल्ला वासीफ उल्ला (आसरा नगर, नांदेड) यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना ७ दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

Intro:नांदेड मध्ये 'येथे लघवी का करतोस म्हणून' केला एकाचा खून...!Body:नांदेड मध्ये 'येथे लघवी का करतोस म्हणून' केला एकाचा खून...!

नांदेड , दि . २२ः काल सायंकाळी साडेपाच ते सहाच्या येथे 'लघवी का करतोस' म्हणून मारहाण केली होती. दरम्यान झालेल्या जीवघेणा हल्ल्यातील एक युवक शुक्रवारी ( दि . २२ ) मरण पावल्याने त्यात कलम ३०२ ची वाढ झाली . या प्रकरणातील दोन युवकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिका - यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .

धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ६ च्या सुमारास सुमित एकलारे आणि त्याचा मित्र शुभम हे दोघे रेल्वे डिव्हीजन कार्यालयासमोर थांबले असतांना चार ते पाच युवक त्यांच्यासमोर धावत आले. येथे लघवी करतोस काय ' , असे म्हणून त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली . या मारहाणीत सुमितच्या उजव्या छातीवर मार लागला .
रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेल्या सुमितला काही नागरिकांनी उचलून रुग्णालयात हलविले . याप्रकरणी सुमितचे वडील गुरूनाथ विश्वनाथ एकलारे यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलिसांनी जीव घेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांनी सुमित आणि शुभम देशमुख यांनी सांगितलेल्या महितीनुसार महम्म्मद सलमान उल्ला वसीफउल्ला, सय्यद सलमान सय्यद रहिम यांना अटक केली. त्यांचे फोटो जखमी सुमितला दाखवले तेंव्हा सुमितने त्यांना ओळखले . पोलिसांनी त्यांना मध्यरात्रीनंतर अटक केली होती . शुक्रवारी दुपारी उपचार घेणाऱ्या सुमित एकलारेचा मृत्यू झाला . - पोलिसांनी या प्रकरणी खुनाचे कलम वाढविण्याचा अर्ज न्यायालयाला सादर केला होता . पोलीस उपनिरिक्षक प्रताप गर्जे आणि त्यांच्या सहका - यांनी पकडलेल्या सय्यद सलमान सय्यद रहीम आणि महम्म्मद सलमान उल्ला वासीफ उल्ला दोघे राहणार आसरा नगर , नांदेड यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना सात दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.