ETV Bharat / state

Young Man Commit Suicide in Nanded : 'माझ्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना त्रास देऊ नका' म्हणत सोशल मीडियावर पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या - suicide by posting on social media in Biloli

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होता आणि तो जामीनावर सुटला होता. "मुलीचे नातेवाईक असलेल्या पाच जणांनी मला या प्रकरणात अडकवून माझी बदनामी केली. आणि मी जामीनावर सुटल्यानंतर ही लोक त्रास देत आहेत म्हणून मी आत्महत्या करत आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकून तरूणाने आत्महत्या ( Young Man Commit Suicide in Nanded ) केली आहे.

Young Man Commits Suicide in Nanded
तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Dec 2, 2021, 5:37 PM IST

नांदेड - सोशल मीडियावर पोस्ट टाकत एका 25 वर्षाच्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या ( Young Man Commit Suicide ) केल्याची घटना घडली आहे. बिलोली तालुक्यातील तोरणा येथे ही घटना घडली आहे. बागेश्वर नरवाडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल -

मयत तरुण बागेश्वर नरवाडे विरोधात नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होता आणि तो जामीनावर सुटला होता. "मुलीचे नातेवाईक असलेल्या पाच जणांनी मला या प्रकरणात अडकवून माझी बदनामी केली. आणि मी जामीनावर सुटल्यानंतर ही लोक त्रास देत आहेत म्हणून मी आत्महत्या करत आहे. त्या पाच जणांना कडक शिक्षा करावी, माझ्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना त्रास देऊ नका असे म्हणत बागेश्वर नरवाडे याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल -

दरम्यान तरुणाच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या बालाजी काठेमोडसह पाच जणांविरोधात रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. मुख्य आरोपी बालाजी काठेमोडला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा - shocking death incident in Thane : टायरमध्ये हवा भरणारा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसविल्याने तरुणाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.