ETV Bharat / state

अटकेपार गेलेल्या अर्धापूरच्या केळीची आता  विदेशातही चव...! - merchent

अर्धापूर तालुका हा केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील केळी देशाच्या विविध भागात पोहोचली आहे. आता विदेशातही या केळीची चव आवडीची बनली आहे.

विदेशातही अर्धापूरच्या केळीची निर्यात होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालालाही चांगला 'मोल' मिळत आहे.
author img

By

Published : Jul 13, 2019, 8:49 PM IST

Updated : Jul 13, 2019, 9:35 PM IST

नांदेड- जिल्ह्यातील अर्धापूर परिसरातील केळी संपूर्ण देशात प्रसिद्ध असून देशाच्या कानाकोपऱ्यासह आता विदेशातही या केळीची चव आवडीची बनली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण व दुबई या भागात केळीची निर्यात होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालालाही चांगला 'मोल' मिळत आहे.

अर्धापूर तालुका हा केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील केळी देशाच्या विविध भागात पोहोचली आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली, हरियाणा राज्यात येथील केळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अर्धापूरची केळी विविध मॉलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.

विदेशातही अर्धापूरच्या केळीची निर्यात होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालालाही चांगला 'मोल' मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावरूनच पॅकिंग करून थेट माल पाठविण्याची किमया परिसरातील शंभुनाथ अॅग्रो प्रोड्युसर या कंपनीने केली आहे. हिच केळी जगातील अनेक देशात निर्यात केली जात आहे. यामूळे अर्धापूरच्या केळीची गोडी जगभरात चाखायला मिळत आहे. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुध्दा चांगला भाव मिळत असून त्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळत आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे.

उच्च शिक्षित तरूण शेतकऱ्याने घेतला पुढाकार

तालुक्यातील केळी ही संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. याचाच फायदा घेऊन येथील उच्च शिक्षित तरूण शेतकरी निलेश देशमुख यांनी अर्धापूर येथे 'शंभूनाथ अॅग्रो प्रोड्युसर कंपनी' स्थापन केली. या कंपनीमार्फत अर्धापूर परिसरातील १ हजार ३०० शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेतील केळी अत्याधुनिक पध्दतीने पॅकिंग केले जाते. तसेच योग्य नियोजन करून जगातील इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, दुबई या देशांमध्ये निर्यात करून तेथे विक्रीस पाठविण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीला चांगला भाव मिळत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबली

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर व हिंगोली जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी या तालुक्यातील शेतकरी केळी या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. येथील केळी उत्पादन लक्षात घेऊन व्यापारी शेतकऱ्यांचा माल मातीमोल भावाने खरेदी करून १३ टक्के कमिशन घेत होते. व साधा काटा वापरून वजनातही लूट करीत होते. यातून शेतकऱ्यांची मोठी अर्थिक लूट केली जात होती. ही लूट थांबविण्यासाठी प्रथम केळी उत्पादक तरूण शेतकरी निलेश देशमुख यांनी पुढाकार घेऊन अशा व्यापाऱ्यांची मानसिकता तयार करून १३ टक्क्यांऐवजी ६ टक्के कमिशन आणि केळीच्या मोजमापासाठी इलेक्ट्रॉनिक काटा वापरण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक लूट थांबली आहे.

Intro:अटकेपार गेलेल्या अर्धापूरच्या केळीची आता विदेशातही चव.....!

नांदेड: जिल्ह्यातील अर्धापूर परीसरातील केळी संपूर्ण देशात प्रसिद्ध असून देशाच्या कानाकोपऱ्यासह आता विदेशातही या केळीची चव आवडीची बनली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण व दुबई या भागात केळीची निर्यात होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालालाही चांगला 'मोल' मिळत आहे.Body:अटकेपार गेलेल्या अर्धापूरच्या केळीची आता विदेशातही चव.....!

    नांदेड: जिल्ह्यातील अर्धापूर परीसरातील केळी संपूर्ण देशात प्रसिद्ध असून देशाच्या कानाकोपऱ्यासह आता विदेशातही या केळीची चव आवडीची बनली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण व दुबई या भागात केळीची निर्यात होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालालाही चांगला 'मोल' मिळत आहे.

अर्धापूर तालुका हा केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील केळी देशाच्या विविध भागात पोहोचली आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अर्धापूरची केळी विविध मॉल मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून मोठ्या रिलायंस सारख्या कंपन्यांकडूनही मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावरूनच पॅकींग करून थेट माल पाठविण्याची किमया परीसरातील शंभुनाथ अॅग्रो प्रोड्युसर या कंपनीने हिच केळी जगातील अनेक देशात निर्यात करून जगभरात नेली आहे. यामूळे अर्धापूरच्या केळीची गोडी जगभरात चाखायला मिळत आहे. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुध्दा चांगला भाव मिळत असून त्यांना घामाचा योग्य दाम मिळत आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे.

          तालुक्यातील केळी ही संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. याचाच फायदा घेऊन येथील उच्च शिक्षित शेतकरी तरूण निलेश देशमुख यांनी अर्धापुर येथे ' शंभूनाथ ऍग्रो प्रोड्युसर कंपनी ' स्थापन केली आहे. या कंपनी मार्फत अर्धापूर परिसरातील १ हजार ३०० शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेतील केळी अत्याधुनिक पध्दतीने पॅकिंग व योग्य नियोजन करून जगातील इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, दुबई या देशांमध्ये निर्यात करून तेथे विक्रीस पाठविण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीला चांगला भाव मिळत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. 

          □ नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, मुदखेड, भोकर व हिंगोली जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी या तालुक्यातील शेतकरी केळी या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. येथील केळी उत्पादन लक्षात घेऊन व्यापारी शेतकऱ्यांचा माल मातीमोल भावाने खरेदी करून १३ टक्के कमिशन घेत होते. व साधा काटा वापरून वजनातही लूट करीत होते. यातून शेतकऱ्यांची मोठी अर्थिक लूट केली जात होती. ही लूट थांबविण्यासाठी प्रथम केळी उत्पादक तरूण शेतकरी निलेश देशमुख यांनी पुढाकार घेऊन  अशा व्यापाऱ्यांची मानसिकता तयार करून १३ टक्क्याऐवजी  ६ टक्के कमिशन आणि केळीच्या मोजमापासाठी इलेक्ट्रॉनिक काटा वापरण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक लूट थांबली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी केळी निर्यात करण्यासाठी " शंभुनाथ ऍग्रो प्रोड्युसर कंपनी " स्थापन केली. 

          □ याच शंभूनाथ कंपनीच्या माध्यमातून  परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी या पिकाला भारतातील दिल्ली, चंदीगड तसेच देशाबाहेर जावून  अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण व दुबई सह अनेक देशातही बाजार मिळवून दिला आहे. यातून  अर्धापुरची केळी जगभर पोहोचली आहे. आणि या केळीला जगात मोठी मागणी असल्याचे निलेश देशमुख यांनी सांगितले आहे. या केळी निर्यातीमूळे अर्धापूर परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होत आहे. म्हणूनच " शंभूनाथ " ही केळी उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारे वरदान ठरली आहे. असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. 

-----------------------------------

                                         Conclusion:
Last Updated : Jul 13, 2019, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.