नांदेड - महिला दिनाच्या निमित्ताने पोलिसांकडून मुलींना सुरक्षा पेनचे वाटप करण्यात आले आहे. महिला दक्षता समिती आणि पोलीस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मंत्री चव्हाण यांनी अनपेक्षितपणे एक कविता सादर केली. त्यांच्या या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट करत प्रतिसाद दिला.
- अशोक चव्हाणांची कविता
जन्म द्यायला आई पाहिजे...
राखी बांधायला बहिण पाहिजे...
गोष्टी सांगायला आजी पाहिजे...
पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे...
आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे...
हे सर्व करायच्या आधी एक मुलगी जगायला पाहिजे...