नांदेड - वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असून तो आता जीवावर बेतला आहे. हंगरगा (ता.मुखेड) येथील एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला असून मुखेड तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.
हंगरगा (ता.मुखेड) येथील कमलबाई आणाराव पताळे (वय ६९ वर्ष) या महिला हंगरागा येथे आपल्या शेतात शेती चे अंतर मशागतीचे व चीपाडे वेचन्याचे कामे करत होत्या. यावेळी उन्हामुळे भोवळ येऊन कोसळल्या. त्यांना अस्वस्थ घाबरे वाटू लागल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारा दरम्यान त्यांना उष्माघाताचा त्रास झाला असल्याचे सांगण्यात आले. अशी माहीती हंगरगाचे सरपंच बाबुराव दस्तुरे यांनी दिली. नांदेड येथील शासकीय रुग्णलयात उपचार दरम्यान त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.
यापूर्वी मुखेड तालुकयातील जाहुर येथील शेतकरी माधवराव हिवराळे यांचे काही दिवसापुर्वीच उष्माघाताने निधन झाले. तालुक्यात १५ दिवसात दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याने वाढत्या उष्णते बद्दल नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे.