ETV Bharat / state

Dussehra 2022 : सीमोल्लंघन आणि शस्त्र पूजन करण्यामागे काय आहे खास कारण, तुम्हीही जाणून घ्या - दसरा 2022

5 ऑक्टोबर बुधवार रोजी विजयादशमी (दसरा) (Dussehra 2022) सण साजरा केला जाणार आहे. धर्माच्या विजयाच्या स्मरणार्थ विजयादशमी सण साजरा केला जातो. कुमार गुरुजी जोशी-पाताळयंत्री यांच्याकडून जाणून घ्या सीमोल्लंघन (Simmolanghan) आणि शस्त्र पूजनाविषयी (What is special reason behind weapon worship) खास माहिती.

Dussehra 2022
सीमोल्लंघन आणि शस्त्र पूजन
author img

By

Published : Oct 4, 2022, 4:17 PM IST

नांदेड : देवीने दानवांचा वध करून धर्म आणि देवांचे रक्षण केले होते. तर प्रभू श्रीरामानेही धर्माच्या रक्षणासाठी रावणाचा वध केला होता. म्हणून दसऱ्याच्या दिवशी (Dussehra 2022) देवी आणि भगवान श्रीराम यांच्या शस्त्रांची पूजा केली जाते. त्याचबरोबर धर्माच्या रक्षणासाठी ठेवलेल्या शस्त्रांचीही मंदिरे आणि घरांमध्ये पूजा (What is special reason behind weapon worship) केली जाते.

आयुध पूजा नवरात्री दरम्यान येते आणि देशाच्या अनेक भागांमध्ये लोकप्रिय आहे. आयुध पूजेला शास्त्रपूजा आणि अस्त्र पूजा असेही म्हणतात. प्राचीन काळी आयुध पूजा शस्त्रांच्या पूजेसाठी होती. परंतु सध्या या दिवशी सर्व प्रकारच्या यंत्राचीही पूजा केली जाते. दक्षिण भारत आणि भारताच्या इतर भागांमध्ये, कारागीर देखील विश्वकर्मा पूजेप्रमाणेच या दिवशी त्यांच्या साधनांची आणि अवजारांची पूजा करतात. या दिवशी शस्त्रपूजनासह वाहन पूजनही सुरू झाले आहे. या दिवशी, शस्त्राशिवाय, लोक त्यांच्या वाहनांसह कार, स्कूटर आणि मोटर बाईकची देखील पूजा करतात.

यामुळे केली जाते शस्त्र पूजा : षोडश मातृकामध्ये सहाव्या क्रमात जी देवी येते, तिचे नाव विजया आहे. जगतजननी मत भवानीच्या दोन सखींचे (मैत्रिणी) नाव जया-विजया आहे. यामधील एकीच्या नावावर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. हा सण शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे तसेच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

महाकाली स्तोत्राचे पाठ : या दिवशी हे सर्वजण आपापल्या शस्त्रांची पूजा करतात, कारण हे शस्त्र प्राणांची रक्षा करतात तसेच भरण पोषणाचे साधनही आहेत. या अस्त्रांमध्ये विजया देवीचा वास मानून यांची पूजा केली जाते. सर्वात पहिले शस्त्रांवर पाणी शिंपडून पवित्र केले जाते त्यानंतर, महाकाली स्तोत्राचे पाठ करून शस्त्रांवर हळद, कुंकू, फुल अर्पण करून धूप-दीप दाखवून पूजा केली जाते. त्यानंतर दलाचा प्रमुख थोडावेळ शस्त्रांचा प्रयोग करतो. अशाप्रकारे पूजा करून संध्याकाळी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून विजयादशमीचा सण साजरा केला जातो.

नवीन कामाची सुरुवात : महाभारतानुसार, पांडवांना 13 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात पाठवण्यात आले होते. हा वनवास सुरु करण्याआधी त्यांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या झाडावर ठेवली होती. अर्जुनाने ही शस्त्रे विजयादशमी (दसरा) च्या दिवशी परत आणली. यानंतर त्यांनी युद्धाची तयारी सुरू केली आणि कुरुक्षेत्राचा विजय मिळवला. पांडव विजयादशमीला पुन्हा परत आले, म्हणूनच एक नवीन काम सुरू (Simmolanghan) करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.Dussehra 2022

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.