ETV Bharat / state

मराठवाड्याच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत -डॉ. भागवत कराड

author img

By

Published : Aug 17, 2021, 6:53 PM IST

मराठवाड्याचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांना सांगून लवकरच व्यापक बैठक घेणार आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते व सिंचनाचे प्रश्न सोडवण्यास आम्ही कटीबध्द आहोत. मराठवाड्याच्या विकासाची माझी जबाबदारी असून, मराठवाड्याला झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. ते नांदेड शहरात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

नांदेड - मराठवाड्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांना सांगून लवकरच व्यापक बैठक घेणार आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते व सिंचनाचे प्रश्न सोडवण्यास आम्ही कटीबध्द आहोत. मराठवाड्याच्या विकासाची माझी जबाबदारी असून, मराठवाड्याला झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. ते नांदेड शहरात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड पत्रकारांशी बोलताना

'नांदेडमध्ये जनआशीर्वाद यात्रा दाखल'

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची जनआशिर्वाद यात्रा मंगळवारी नांदेड शहरात दाखल झाली होती. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्याच्या विकासाबाबत आपले मत व्यक्त केले. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत यात्रेच्या माध्यमातून जनतेचा संदेश आम्ही पोहचवू पाहत आहोत.

'मराठवाड्याच्या प्रश्नांची मला जाणीव'

एका शेतकऱ्याने फेटा भेट दिला तर प्रा. शेषेराव मोरे यांनी एक पुस्तक मोदींसाठी भेट दिले आहे. डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी मराठवाड्यातील विविध प्रश्नांबाबत माझ्याशी चर्चा केली आहे. मी दोन वेळा मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मराठवाड्याच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. प्रशासकीय पातळीवर व्यापक बैठक घेवून मराठवाड्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. अतूल सावे, आ. डॉ. तूषार राठोड, मनोज पांगरकर, गणेश हाके, बापू घडामोडे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.