नांदेड - कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य कराव्यात अन्यथा महापालिकेसमोर सरण रचून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. दिव्यांगाना कल्याणकारी योजनेतून मिळणारे घरकुल, व्यवसायासाठी २०० चौ.मी गाळे मिळावेत, आणि महापालिकेचा दिव्यांग अनुशेष भरण्यात यावा, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आत्मदहनाचा इशारा-
दिव्यांगाना न्याय मिळावा, या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलन केले आहे. मात्र प्रशासनाला जाग आली नाही. दिव्यांगाना कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा अन्यथा महापालिकेसमोर सरण रचुन आत्मदहन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यानी दिला आहे.
हेही वाचा- चिंताजनक..! नव्या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण भारतात सापडले