ETV Bharat / state

Unseasonal Rain in Nanded: नांदेडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान; वीज पडून पाच जनावरांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 27, 2023, 7:17 AM IST

नांदेडमध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडली आहेत. तर केळी, उन्हाळी ज्वारी आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारच्या वादळी वाऱ्याने उन्हाळी ज्वारी आडवी पडली आहे. हाताशी आलेले ज्वारीचे पीक आडवे झाले आहे.

Unseasonal Rain and Hailstorm
नांदेडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिट
नांदेडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

नांदेड : नांदेडमध्ये बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. भाजीपाल्यासह पपई आणि कलिंगडाच्या बागेला गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे. पपई आणि कलिंगडाच्या फळाला गारांचा मार लागल्याने दोन्ही फळबागा नष्ठ झाल्या आहेत. त्यामुळे हाताशी आलेल्या या दोन्ही फळबागांवर शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

बळीराजाला पावसाचा तडाखा : मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पाच तालुक्यांमध्ये गारपीट झाली आहे. या गारपिटीत नगदी पीक असलेल्या डाळिंब, केळी आणि पपईच्या बागा जमिनदोस्त झाल्या. बागांमध्ये गारांचा खच साचला होता तर, सोसाट्याच्या वाऱ्याने पपईचे पीक आडवे झाले आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा बळीराजाला पावसाचा तडाखा सहन करावा लागला आहे. सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असली तरी पावसाचे थैमान सुरूच आहे.

गारपिटीने पिकांचे नुकसान : सकाळपासून कडक ऊन पडले होते. मात्र, अचानक वातावरणात बदल झाला आणि आभाळ दाटून आले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. काही वेळातच मुसळधार पाऊस झाला. यात अनेक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला. या गारपिटीने पिकांचे मात्र अतोनात व नुकसान झाले आहे. सध्या रबी हंगाम आटोपत आला आहे. शेतात काही पिके शिल्लक आहेत. मात्र, गारपिटीने बागायती पिकांना जबर फटका बसला आहे.

नागरिकांची धांदल उडाली : अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. या तालुक्यात केळी, पपई आणि डाळिंब बागा भुईसपाट झाल्या. डाळिंब बागांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मालेगाव, कामठा परिसरात केळी, हळद या पिकांचे गारपीटीमुळे नुकसान झाले आहे. अर्धापूर भोकर कंधार तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी अचानकपणे वादळ वारा सुरु होऊन गारांचा पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली होती.

वीज पडून ५ जनावरे दगावली : शहरातील तरोडा, भाग्यनगर, काबरानगर, सिडको-हडको आदी भागात गारा पडल्या. वादळ वायामुळे काही काळ वीज पुरवठाही खंडीत झाला होता. तर सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसात वीज पडून ५ जनावरे दगावली आहेत. लोहा तालुक्यात जवळा देशमुख येथे उत्तम शिखरे यांचा बैल, शेवडी तांडा येथे बालाजी तुकाराम चव्हाण यांची गाय, कंधार तालुक्यात बिजेवाडी येथे दिगंबर बाबूराव लुंगारे यांच्या मालकीची म्हैस आणि मुखेड तालुक्यातील वर्ताळा येथे एक म्हैस व एक वासरू वीज अंगावर पडून ठार झाले.

हेही वाचा : Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा 780 गावांना फटका, 65 हजार शेतकऱ्यांचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.