नांदेड- विलगीकरण करण्यात आलेले दोन रुग्ण शहरातील जुना मोंढा परिसरात फिरत होते. पोलिसांनी या दोन्ही रुग्णांची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आहे. मात्र, घटनेमुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत नांदेड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लगेच जुना मोंढा गाठत या दोघा रुग्णांची चौकशी केली. रुग्णांचा हा भयंकर प्रकार पाहून अनेकजण त्यांच्यापासून पळ काढत होते. परंतु, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून या दोघा रुग्णांची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आहे.
हेही वाचा- Coronavirus : कृपया घरीच थांबा, अशोक चव्हाणांनी शेअर केला व्हिडिओ