ETV Bharat / state

Sanjay Biyani Murder Case : संजय बियाणी हत्या प्रकरणी आणखी दोघे अटकेत, आरोपींची संख्या 9 वर - आणखी दोघे अटकेत

व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी ( Sanjay Biyani Murder Case ) नांदेड पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. आत या हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. हरीश मनोज बाहेती ( रा. मारवाडी गल्ली, नांदेड ) आणि कृष्णा पवार ( रा.अमदूरा जि.नांदेड ), असे त्या दोघांची नावे आहेत.

संजय बियाणी
संजय बियाणी
author img

By

Published : Jun 4, 2022, 10:17 PM IST

नांदेड - व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी ( Sanjay Biyani Murder Case ) नांदेड पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. आत या हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. हरीश मनोज बाहेती ( रा. मारवाडी गल्ली, नांदेड ) आणि कृष्णा पवार ( रा.अमदूरा जि.नांदेड ), असे त्या दोघांची नावे आहेत.

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर 5 एप्रिल रोजी अज्ञातांनी ( Fire on Builder Sanjay Biyani ) गोळीबार करण्यात आला होता. यात बियाणी व त्यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना दाखल करण्यात आले असताना उपचारा दरम्यान ( Sanjay Biyani died in Nanded ) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस तपास करत असून यापूर्वी पोलिसांनी सात जणांना अटक करण्यात आली असून या दोघांना अटक केल्यानंतर आरोपींची संख्या नऊ झाली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

खंडणीच्या वसुलीसाठी गोळीबार? - संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे बांधकाम व्यावसायिक होते. खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. गतवर्षी बियाणी यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून एका कुप्रसिद्ध गुंडाच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. तेव्हा मोठ्या शिताफीने बियाणी यांनी मी तो नव्हेच, असे सांगून मोठ्या शिताफीने हल्ला परतवून लावला होता.

हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच काढला सुरक्षा रक्षक - बियाणी यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला होता. पण, हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी त्यांचा सुरक्षा रक्षक काढण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर घरासमोरच हल्ला झाला.

हेही वाचा - Nanded Crime News : बायकोला धारदार शस्त्राने भोसकल्यानंतर नवऱ्याने विष घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.