ETV Bharat / state

नांदेडमधील सिडकोत भरदिवसा तलवार हल्ला; दोन जखमी

सिडको भागातील संभाजी चौक परिसरात ७ ते ८ जणांच्या टोळक्याने दोघांवर हल्ला केला. पोलिसांनी हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात हलवले आहे.

author img

By

Published : Jun 10, 2020, 9:46 AM IST

Breaking News

नांदेड- शहरातील सिडको भागातील मुख्य बाजारपेठेत दुचाकीवर आलेल्या ७ ते ८ जणांनी तलवार हल्ला करुन दोघांना जखमी केले. मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली.

ढवळे कॉर्नर परिसरातून तीन दुचाकीवर ७ ते ८ जण मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सिडको भागातील संभाजी चौक परिसरात दाखल झाले. हातात तलवार व चाकू घेतलेल्या या टोळक्याने सुनील भगवानराव सूर्यवंशी व शेख रहीम शेख लाला यांच्यावर तलवारीने जबर हल्ला चढविला.यात सूर्यवंशी व शेख लाला जखमी झाले. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

नांदेडमध्ये सिडकोत भरदिवसा तलवार हल्ला
नांदेडमध्ये सिडकोत भरदिवसा तलवार हल्ला

घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, सुरेश थोरात हे फौजफाटयासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मारहाणीत जखमी झालेल्या सुनील सूर्यवंशी व शेख रहीम शेख लाला यांना शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले आहे.

ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.सिडको-हडको परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. शिवाय गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, व्यवहार पूर्ववत सुरू होताच पुन्हा गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे दिसून येते. या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम गुन्हे शाखेवर सोपवण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या हल्ला प्रकरणात मंगळवारी रात्रीपर्यंत कुणालाही अटक झालेली नव्हती आणि गुन्हाही नोंद झाला नव्हता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.