ETV Bharat / state

नांदेड : 1202 जणांची कोरोनावर मात, तर 518 नवे बाधित - Nanded corona news today

नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 662 अहवालापैकी 518 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

today 1202 new COVID-19 cases in Nanded
नांदेड : 1202 जणांची कोरोनावर मात, तर  518 व्यक्ती कोरोना बाधित...!
author img

By

Published : May 2, 2021, 8:45 PM IST

नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 662 अहवालापैकी 518 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 444 तर अँटिजेन तपासणीद्वारे 74 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 81 हजार 284 एवढी झाली असून यातील 69 हजार 954 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 9 हजार 468 रुग्ण उपचार घेत असून 214 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

25 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू
दि. 1 ते 2 मे या दोन दिवसांच्या कालावधीत 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 599 एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.6 टक्के आहे.

उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 50, भक्ती जंबो कोविड केअर सेंटर 26 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब - 4 लाख 66 हजार 12
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 3 लाख 75 हजार 120
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 81 हजार 284
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 69 हजार 954
एकूण मृत्यू संख्या - 1 हजार 599
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.06 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 12
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 113
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 380
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 9 हजार 486
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 214

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.