नांदेड - नांदेड जिल्ह्यातील (Nanded Accident) मुदखेड तालुक्यातील राजवाडी गावाजवळ आठवडी बाजाराठी हिमायतनगरकडे जाणारा टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन व्यवसायिकांचा जागीच मृत्यू (Three people lost lives in accident) झालाय. दरम्यान खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने, टेम्पो पलटी झाला व अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात 3 ठार तर 07 जण जखमी (Seven people injured) झाले असून; जखमींना मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत व्यक्तिंचे प्रेत शासकीय रुग्णालयात उत्तरतपासणीसाठी हलवण्यात आले आहे.
टेम्पो चालकाचा ताबा सुटला : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील व्यापारी हे जिल्हाभरात सर्व आठवडी बाजार करतात. अनेक व्यापारी भाजीपाला, धान्य, आदी साहित्य विकण्यासाठी एका वाहनाने नेहमी तालुकास्तरावर असलेल्या आठवडी बाजारासाठी जातात. नेहमीप्रमाणे बुधवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी हिमायतनगर येथील आठवडी बाजारसाठी मुदखेडचे व्यापारी (एमएच०४ जीएफ- २७०५) या आयचर टेम्पोमधून हिमायतनगरकडे जात होते. हा टेम्पो मुदखेड ते भोकर रस्त्यावर असलेल्या राजवाडी जवळ एका वळणावर आला असताना, टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो उलटला.
जखमींवर उपचार सुरू : आठवडी बाजाराला जाणारे किरकोळ विक्रेते, या टेम्पोत बसून हिमायतनगरला जात होते. त्याचवेळी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यातुन जाताना टेंपो उलटून हा अपघात झालाय. यातील जखमींवर मुदखेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अपघातानंतर मृत व्यक्तिंच्या नातेवाईकांनी, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात संताप व्यक्त केलाय.
अपघाताची माहिती मिळताच, सोनखेड पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरिक्षक भोसले, पोलिस उपनिरीक्षक परिहार, पोलीस कर्मचारी श्याम बनसोडे, अंगद कदम, उत्तम कांबळे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन, मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.Nanded Accident