नांदेड - देगलूरमध्ये अरबी भाषा शिकवणाऱ्या मौलवीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असल्याची घटना घडली होती.. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी तत्काळ आरोपीच्या मुसक्या आवळून बिलोली न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने मौलवीसह अन्य दोन साथीदारांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - निर्भया प्रकरण: दिल्ली न्यायालयाने फेटाळली आरोपी मुकेश सिंहची याचिका
देगलूर येथील मस्जिदीमध्ये अरबी भाषा शिकविणारा मौलवी शेख एजाज शेख नबी याने अरबी भाषा शिकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. पीडित मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरून देगलूर पोलीस ठाण्यात पोक्सो, बाललैंगिक अत्याचार व अन्य कलमान्वये मौलवीसह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी घटनेचे गांभीर्य पाहून दोन पोलीस पथके तयार केले होते. त्यानंतर दोन तासांच्या आत आरोपीस पाळा (ता. मुखेड) येथून तर अन्य दोघास देगलूर येथून अटक केली.
तीन्ही आरोपीस बिलोली न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.