ETV Bharat / state

दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी लांबविली चाळीस हजारांची दारू, कंधारमध्ये गुन्हा दाखल

लॉकडाऊनंतर दारुची दुकाने सुरू झाली आहेत. असे असताना दारुचे दुकान फोडून दारू लंपास केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे घडली आहे.

author img

By

Published : May 21, 2020, 1:42 PM IST

stole Rs 40,000 worth of liquor
चोरट्यांनी लांबविली चाळीस हजारांची दारू

नांदेड - एकीकडे लॉकडाऊन असताना दुसरीकडे मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. तरीही कंधार येथे दारूच्या दुकानाची भिंत फोडून दारू चोरल्याची घटना समोर आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात दोन महिन्यांच्या जवळपास मद्य विक्रीचे दुकान बंद होते. अशातच गावठी दारुसह अनेक ठिकाणी दारू तस्करीसह दुकानाचे कुलूप तोडून दारू चोरीच्या घटना घडल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र आता मद्यविक्री सुरू केल्यानंतरही कंधार शहरातील वैद्यनगर भागातील एका देशी दारूच्या दुकानाची चक्क भिंत पाडून हजारो रुपयांची देशी दारू चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

दुकाने फोडून दारु लंपास केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे घडली आहे

आतापर्यंत कुलूप फोडून चोऱ्या झाल्याच्या अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मात्र आता चोरट्यांनी चक्क दुकानाची भिंत फोडून दारू लांबविल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दुकान मालक श्यामकुमार गौड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.