नांदेड: किनवट राज्य रस्त्यावरील इस्लापूर पासून ४ कि.मी.अंतरावर असलेला,रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सहस्रकुंड (Bears witness to the history of the Ramayana period) धबधब्याचे मनोहारी दृश्य प्रत्येकवर्षी पावसाळ्यात पहावयास मिळते. गेल्या काही दिवसांपासुन सतत पडत असलेल्या पावसाच्या हजेरीने धबधबा (The Sahasrakund waterfall) ओसंडून वाहु लागला आहे. एकूणच सहा महिन्यापासून धबधबा पाहण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांची पाऊले सहस्रकुंड धबधब्याच्या दिशेने आपसूकच वळल्याचे पाहावयास मिळत आहे.
रामायण कालीन अख्याईका असलेल्या या नैसर्गिक धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले या दिशेने वळत आहेत. मागील चार वर्षानंतर जूलै महिन्यात सहस्रकुंड धबधबा वाहत असल्याने, १०० ते १५० फुटावरून पडणारा धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विहंगम दृश्याचा आनंद पर्यटक ८० फुट उंचीच्या मनोर्यावरून घेत आहेत. या पावसामुळे संपूर्ण परिसर देखील हिरवा शालू पांघरण्यासाठी सज्ज झाला असून, धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर असल्याने पर्यटकांना दर्शनाचाही योग येतो आहे. भगवान परशुराम यांच्या धनुष्यातून निघालेल्या बाणामुळे निर्माण झालेल्या या सहस्त्रकुंडला पर्यटनाचा दर्जा मिळालेला आहे. या ठिकाणी श्रावण मासाच्या प्रत्येक सोमवारी दर्शनसाठी भाविक येतात. येथे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिस आणि मंदिर प्रशासनाने सुरक्षा गार्ड तैनात करून संभाव्य घटना टाळण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा :Healthy Herbal Tea : या पावसाळ्यात 'या' 5 आश्चर्यकारक औषधी वनस्पतींनी तुमचा चहा निरोगी बनवा