नांदेड - जिल्ह्यातील टाकळी (बु) (ता. नायगाव) येथील बंधारात चार व्यक्ती अडकले होते. अग्निशमन दल शोध व बचाव पथक यांनी बोट, रेस्क्यू रोप, तराफा घटनास्थळी घेऊन पोहचले. बंधाऱ्याच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह फार जास्त असतानाही चार जणांना सुखरूप बाहेर काढले.
जिल्ह्यातील टाकळी (बु) (ता. नायगाव) येथील बंधारात चार व्यक्ती अडकले होते. अग्निशमन दल शोध व बचाव (बोट, रेस्क्यू रोप , तराफा इ.) साहित्यासह घटनास्थळी पोहचले. बंधाऱ्याच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह फार जास्त प्रमाणात होता. प्रथम वेळी बोट घेऊन त्या चारही व्यक्तीपर्यंत पोहचले. पण, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे व पाण्याची पातळीत असल्यामुळे बोट ही पाण्याचा प्रवाहात खाली जात होती. चौघांमध्ये एक वृद्ध व्यक्ती होती. त्यांना प्रवाहाबाहेर काढमए शक्य होत नव्हते. पण, नियोजनबद्ध पद्धतीने विरुद्ध दिशेने बोट व रेस्क्यू रोच्या सहायाने त्या चार जणांना पाण्याबाहेर सुखरुप काढण्यात बचाव पथकाला यश आले.
यामध्ये पुरामध्ये (बंधारा) अडकलेल्या व्यक्तीमध्ये लक्ष्मण पोचीराम डुबुकवाड (वय 63 वर्षे, रा. येल्लोरी) संभाजी लिंबूराम घंटेवाड (वय 25 वर्षे, रा. भुतानी परगा), रामदास महादेव आवळे (वय 25 वर्षे, रा. वडगांव), राजु विठ्ठल सोनकांबळे (वय 42 वर्षे, रा. टाकळी) यांचा समावेश होता या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. याबद्दल अग्निशमन दल शोध व बचाव पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात अतिमूसळधार पाऊस, सर्व पिके पाण्याखाली; गुलाबी वादळाचा फटका