ETV Bharat / state

शासकीय व न्यायालयीन कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या पोलिसांंना न्यायाधीशानी फटकारले - judge warned the police in nanded

न्यायालयाच्या वेळेप्रमाणे शासकीय कर्मचारी व सरकारी वकिल संचारबंदीतही येत राहतील. अशा कर्मचारी व विधीज्ञांना अडवणूक करून दंड आकारल्याच्या कारणांवरून जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलेच फटकारले आहे.

District court nanded
जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड
author img

By

Published : Jul 15, 2020, 8:10 PM IST

नांदेड - न्यायालयाच्या कार्यालयीन वेळा ठरलेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या वेळेप्रमाणे शासकीय कर्मचारी व सरकारी वकिल संचारबंदीतही येत राहतील. अशा कर्मचारी व विधीज्ञांना अडवणूक करून दंड आकारल्याच्या कारणांवरून जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलेच फटकारले. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या दंडाबाबत योग्य निर्देष देण्याबाबत पत्राव्दारे कळविले आहे.

न्यायालयाची कार्यालयीन वेळ ही सकाळी साडे दहा ते पाच वाजेपर्यंतची आहे. या कालावधीत कर्मचारी व वकिल मंडळी कामावर येता-जाता ओळखपत्र दाखवित असल्यास विनाकारण दंडात्मक कारवाई करू नये, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक अ. धोळकिया यांनी ठणकावले आहे. तसेच ज्या कर्मचार्‍यांना चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या दंडाबाबत योग्य निर्देश देण्यात यावे, अशा सूचना न्यायाधीश धोळकिया यांनी दिले आहेत.

पोलीस अधीक्षकांना लिहलेल्या पत्रात म्हटले, की दि. 14 जुलै रोजी शहरातील वजिराबाद चौक, तरोडा चौक व आयटीआय चौकात पोलिसांकडून न्यायालयाचे कर्मचारी विधीज्ञांना अडवून विचारणा केली गेली. ओळखपत्र दाखवून ही काही कर्मचारी व विधीज्ञ यांना दंड आकारण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांच्या विधानाचा गैर अर्थ लावून दंड आकारला गेला आहे. मुळात न्यायालय कामकाज हे सकाळी अकरा वाजल्यापासून सुरु होते. असे पत्रात नमूद केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.