ETV Bharat / state

bharat jodo yatra : भारत जोड़ो यात्रेची महाराष्ट्रातील पहिली सभा नांदेड मध्ये - भारत जोड़ो यात्रेची महाराष्ट्रातील पहिली सभा

काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांच्या भारत जोड़ो यात्रेची महाराष्ट्रातील पहिली सभा (First meeting of Bharat Jodo Yatra in Maharashtra ) गुरूवारी नांदेड मध्ये होणार. काँग्रेस पक्षाच्यावतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

bharat jodo yatra
कांग्रेसचे नेते राहुल गांधी
author img

By

Published : Nov 10, 2022, 2:14 PM IST

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांच्या भारत जोड़ो यात्रेची महाराष्ट्रातील पहिली सभा गुरूवारी नांदेड मध्ये पार पडणार आहे. गुरूवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन मोंढा मैदानात ही सभा होणार आहे. या सभेची नांदेड काँग्रेस पक्षाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. ५० ते ६० हजाराहून अधिक नागरिक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी एकूण चार भव्य स्टेज देखील तयार करण्यात आले आहेत.

भारत जोड़ो यात्रेची महाराष्ट्रातील पहिली सभा नांदेड मध्ये होणार

सभास्थळाची पाहणी: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या सभास्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार अमर राजुरकर ( MLA Amar Rajurkar ), माजी मंत्री डीपी सावंत ( Former Minister DP Sawant ), सह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. गुरूवारी सायंकाळी ६ च्या सुमारास राहुल गांधी यांची भारत जोड़ो यात्रा नवीन मोंढा येथे सभा स्थळी दाखल होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात होणार आहे. सभा पार पडल्यानंतर ही यात्रा शहरा जवळ असलेल्या महादेव पिंपळगाव या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे. महादेव पिंपळगाव या ठिकाणी राहुल गांधी यांच्या यात्रेचा मुक्काम असणार आहे.

दुपारी दाखल होणार यात्रा : गुरूवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चांदसिंग कॉर्नर हुन ही यात्रा देगलूर नाका येथे पोहचनार आहे. त्यानंतर बाफना, ड़ॉ बाबासाहेब अंबेडकर पुतळा, छत्रपति शिवाजी महाराज पुतळा, मुथा चौक, कलामन्दिर, शिवाजीनगर, आयटीआय मार्गे ही यात्रा नवीन मोंढा येथे होणाऱ्या सभा स्थळा पर्यंत पोहचनार आहे. दरम्यान आज या भारत जोड़ो यात्रेचे तीसरे दिवस होते. शंकरनगरहुन बुधवारी सकाळी ही यात्रा नायगांव कड़े रवाना झाली. विश्रामा नंतर ही यात्रा बुधवारी दुपारी ४ नंतर कृष्णुर येथील मुकाम स्थळी रवाना झाली. हजारोच्या संख्येने नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोड़ो यात्रेचे ६३वा दिवस आहे. या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.