ETV Bharat / state

लोकांचे पैसे बुडविण्यासाठी पैशांची बॅग चोरल्याचा बहाणा, पोलिसांकडून सत्य उघड - पैशांची चोरी

लोकांनी उसने घेतलेले पैसे परत मागू नयेत म्हणून एका व्यक्तीने आपली साडेआठ लाख रुपयांची बॅग दरोडेखोरांनी चोरली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली. मात्र, काही वेळातच पोलिसांनी या व्यक्तीचे पितळ उघडे पाडले.

लोकांचे पैसे बुडविण्यासाठी पैशांची बॅग चोरल्याचा बहाणा, पोलिसांकडून सत्य उघड

author img

By

Published : May 28, 2021, 9:08 PM IST

नांदेड - लोकांनी आपल्याला उसने घेतलेले पैसे परत मागू नयेत म्हणून शहरातील एका व्यक्तीने चांगलीच शक्कल लढवली. या व्यक्तीने आपली साडेआठ लाख रुपयांची बॅग दरोडेखोरांनी चोरली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली. मात्र, काही वेळातच पोलिसांनी या व्यक्तीचे पितळ उघडे पाडले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर बॅग चोरीला गेलीच नाही, हे स्पष्ट झाले. परंतु, या तक्रारीनंतर पोलिसांचीही काही काळ चांगलीच तारांबळ उडाली होती. या व्यक्तीचे नाव गणेश उत्तम पतंगे (रा. सोमेश कॉलनी) असे आहे.

पोलिसांनी केली होती नाकाबंदी

या व्यक्तीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आपली बॅग चोरीला गेली अशी तक्रार दिली. यानंतर पोलीसांनी तातडीने नांदेडच्या चारही दिशांना जलदगतीने नाकाबंदी केली. तसेच, आसपासची दुकाने बंद करणे सुरू असल्याने, व्यापारी वर्गाचीही धांदल उडाली होती. पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे, जगदीश भंडरवार, साहेबराव नरवाडे, अभिमन्यु साळुंके, संजय ननवरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी या भागात आले होते.

'पैसे बुडविण्यासाठी केला हा प्रकार'

खोटी तक्रार करण्याचा प्रयत्न का केला या बद्दल माहिती घेतली असता, तक्रारदार गणेशने सांगितले की, इतर अनेक लोकांचे पैसे देणे बाकी आहे. त्यांनी आपल्याला पैसे मागू नयेत, म्हणून हा सर्व प्रकार केल्याचे सांगितले. मात्र, अगोदरच उन्हाळा आणि त्यात साडेआठ लाखांची बॅग चोरीला कशी गेली याबाबद पोलिसांना शंका आली होती. या संदर्भात तक्रारदार गणेश पतंगेविरुध्द या तक्रारी संदर्भात कार्यवाही करण्याचा विचार सुरू असल्याचे, पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी

हेही वाच - म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्रात इंजेक्शनचा पुरवठा करा; केंद्राला उच्च न्यायालयाच्या सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.