ETV Bharat / state

Telangana CM KCR in Nanded :...तर महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही; शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केसीआर आक्रमक, शिंदे सरकार टार्गेट

तेलंगाणामधील शेतकऱ्यांना आम्ही विविध सुविधा देत आहोत. अशाच सुविधा महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही, असा सवाल तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विचारला आहे. केसीआर यांची आज जाहीर सभा नांदेडमध्ये झाली. तसेय येथील शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा द्या तर मी महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही, असे आव्हानही केसीआर यांनी राज्य सरकारला दिले आहे.

kcr
केसीआर
author img

By

Published : Mar 26, 2023, 5:12 PM IST

Updated : Mar 26, 2023, 7:14 PM IST

तेलंगाणा मुख्यमंत्री केसीआर

नांदेड - तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आम्ही शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी एकरी 10 हजार रुपये देतो. तसेच 24 तास मोफत वीज शेतकऱ्यांना दिली जाते. एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला 5 लाख रुपयांचा विमा देण्यात येतो. मग अशा सर्व सोयीसुविधा आम्ही देऊ शेतकऱ्यांना देऊ शकतो तर महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही, असा सवाल केसीआर यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे सरकारवर टीका - केसीआर यांनी लोहा येथील सभेत महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यापुढे महाराष्ट्रातील शेतकऱयांना आमचा बीआरस पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. ज्या सुविधा आम्ही आमच्या राज्यातील शेतकऱयांना देतो मग तशा सुविधा महाराष्ट्रातील शेतकऱयांना हे राज्य सरकार का देत नाही, असा सवाल केसीआर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार - तेलंगाणाचा मुख्यमंत्री यांनी आता आपला पुढील मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. याआधीही केसीआर यांची नांदेडमध्ये एक जाहीर सभा झाली होती. त्यावेळी देखील केसीआर यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राज्य सरकारवर टीका केली होती. आता आज(26 मार्च) केसीआर यांची नांदेडमध्ये दुसरी सभा झाली. यावेळीही त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुद्दे मांडत शिंदे - फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार असल्याचे, केसीआर यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांना टोला - देवेंद्र फडणवीस मला म्हणाले तुमचे काम तेलंगाणामध्ये असून, महाराष्ट्रत नाही. तुम्ही तिकडे पाहा, असे फडणवीस म्हणाले होते. मी भारताचा नागरिक आहे. मी भारताच्या नागरिकांसाठी काम करणार आहे. मी महाराष्ट्रात येणार नाही. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीज मोफत, पाणी मोफत, शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये, तेलंगाणा राज्यात ज्या योजना आहेत त्या महाराष्ट्रातील जनतेला देण्यात येतील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे तर मी महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही. या सर्व योजना महाराष्ट्रातील जनतेला मिळाल्यास मला महाराष्ट्रात येण्याची गरज नाही, असे के. चंद्रशेखर राव म्हणाले.

  • The Power of Pink Flag!

    One BRS Meeting - Maharashtra Govt announced ₹6000 to farmers: BRS President, CM Sri KCR. pic.twitter.com/S9OQz5XieF

    — BRS Party (@BRSparty) March 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एकरला दहा हजार रुपये द्या - याआधी नांदेडमध्ये आमची पहिली सभा झाली आणि आमची धसकी घेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना 6 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. पण आम्हाला 6 हजार रुपये नको, आम्हाला एकरला 10 हजार रुपये अनुदान पाहिजे, अशी मागणी देखील के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. कोणासमोर भीक मागण्याची गरज नाही, म्हणून मी एक नारा दिला आहे तो म्हणजे 'अब की बार किसान सरकार', असा नारा देखील राव यांनी दिला.

केंद्रावर जोरदार टीका - केसीआर यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. देशात 270 शेतकऱ्यांचा जीव गेला पण पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत. पण निवडणूक आली की त्याच शेतकऱ्यांची माफी मागत मते मागतात. आतापर्यंत 70 वर्षात सर्वाधिक काळ काँग्रेसचे राज्य होते व त्यानंतर भाजपचे, तरीही देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. एक वेळेस पर्याय म्हणून शेतकऱ्यांचे सरकार आणा, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही नक्की सोडू, तेलंगणामध्ये जो विकास झाला तोच देशभर करू, शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी व शेतीला लागणारे इतर सामग्री देण्यास सरकार कटिबद्ध राहील. देशात सध्या जातिवाद व धर्मवाद वाढत आहे, असेही केसीआर यावेळी म्हणाले.

तेलंगाणातील सोयीसुविधा - तेलंगणाची सीमा महाराष्ट्राला लागूनच असल्यामुळे केसीआर यांनी आता महाराष्ट्र लक्ष केले आहे. तेलंगाणा सरकारने लग्नासाठी मदत करणे, घर बांधकामासाठी मदत करणे, धनगर बांधवांसाठी शेळ्या-मेंढ्याची योजना तयार करणे, महिलांसाठींच्या योजना राबवणे, शैक्षणिक सवलती देणे अशा अनेक सोयीसुविधा मिळवून दिल्या आहेत. या सर्व सुविधा सीमेवरील रहिवासी पाहत आहेत. हा मुद्दा जवळ करत आता केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गळ घातली आहे. याआधीही केसीआर यांनी नांदेडमध्ये सभा गेतली होती.

हेही वाचा - KCR Criticized PM Modi : खासगीकरणावरुन केसीआर यांचा मोदी सरकारवर घणाघात; म्हणाले, 2024 मध्ये आम्हीच सत्तेत

Last Updated : Mar 26, 2023, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.