ETV Bharat / state

KCR Criticized PM Modi : खासगीकरणावरुन केसीआर यांचा मोदी सरकारवर घणाघात; म्हणाले, 2024 मध्ये आम्हीच सत्तेत

author img

By

Published : Feb 5, 2023, 8:59 PM IST

Updated : Feb 5, 2023, 10:20 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रात सत्तेत आहेत, ते त्यांना हवे तितके ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण करू शकतात. परंतु 2024 नंतर आम्हीच सत्तेत येऊ आणि आम्ही मोदींनी खासगीकरण करण्याबाबतचे घेतलेले निर्णय मागे घेऊ, तसेच आम्ही ऊर्जा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करू, असे म्हणत तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केंद्रातल्या भाजपवर जोरदार टीका केली आहे. केसीआर हे आज नांदेडमध्ये जाहीर सभेसाठी आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

तेलंगाणा मुख्यमंत्री केसीआर यांची पत्रकार परिषद

नांदेड - बीआरएस प्रमुख व तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर हे आज नांदेडमध्ये आले होते. पक्षाचे नाव बदलल्यानंतर केसीआर यांनी महाराष्ट्रात आज पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांना केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर केसीआर यांनी आज प्रकाश टाकला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली.

कंपन्या सरकारला ब्लॅकमेल करतील - भारताकडे 361 अब्ज टन कोळशाचे साठे आहेत, आमच्याकडे इतकी संसाधने आहेत तरीही आम्ही खासगी कंपन्यांकडे वळत आहोत. यात अदानी पॉवर, अंबानी पॉवर या खासगी कंपन्यांकडे केंद्र सरकारला जाण्याची गरजच नाही. जर संपूर्ण वीज क्षेत्राचे खासगीकरण केले, तर कंपन्या सरकारला ब्लॅकमेल करतील, असे म्हणत केसीआर यांनी सध्या सुरू असलेल्या अदानी शेयर्स वादावरुन सरकारला धारेवर धरले.

अबकी बार किसान सरकार - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पर्यात नसतो तेव्हाच माणूस आत्महत्या करतो. यापेक्षा वाईट कोणतीही गोष्ट नाही. शेतकरी आत्महत्यांबाबत महाराष्ट्र अव्वल आहे याचे दु:ख आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, तर राजकीय नेते विधानसभेत आणि संसदेत भाषण देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे ‘अबकी बार किसान सरकार’, अशा नारा बीआरएस पार्टीने दिला आहे, असेही केसीआर म्हणाले.

एकजूट होण्याची गरज - सध्या देशातील राजकीय वातावरण खूप बदलले आहे. त्यामुळे आता देशात परिवर्तनाची आवश्यता आहे. देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली आहेत. यादरम्यान देशात अनेकदा सरकारे बदलली. सर्व सरकारांनी निवडणुकीदरम्यान मोठी आश्वासने दिली. मात्र, आज देशात पिण्यासाठी पाणी नाही, शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी नाही, वीज मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण समजून घेऊन एकत्र लढा दिला पाहिजे. शेतकऱ्यांनी आता यासाठी एकजूट होण्याची गरज आहे, असे के.चंद्रशेखर राव नांदेडमध्ये म्हणाले.

भारत राष्ट्र समिती पक्षाचा अजेंडा - मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत देशातील पाणी समस्येवर प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा अजेंडाही सांगितला. ते म्हणाले, विचारधारा बदलली तर भारत बदलेल. भारताला बदलण्यासाठी आमचा पक्ष खूप प्रयत्न करेल. देशात लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकजूट होण्याची गरज असल्याचे केसीआर म्हणाले.

परिवर्तनासाठी मोठे योगदान - देशातील जनतेला खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. धर्म आणि जातीवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जात आहे. मनमानीपणा सुरू आहे. अशाने आपला देश कुठे जाणार? प्रगती कशी करणार? जगातील इतर देशांची स्पर्धा करत पुढे कसा जाणार? हीच देशातील सत्य परिस्थिती आहे. देशातील जनता, मीडिया परिवर्तनासाठी मोठे योगदान देऊ शकते, असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

वाहतूक व्यवस्था - दरम्यान, देशातील मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा स्पीड सरासरी २४ किमी प्रति तास आहे. तर चीनमधील मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा स्पीड सरासरी १२० किमी प्रति तास आहे. अशा परिस्थितीत आपण चीनशी कशी स्पर्धा करणार, या गोष्टी शक्य तरी आहेत का, अशी विचारणाही केसीआर यांनी केली.

अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते - भारत देश पाणी, वीज, पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात मागे पडत चालला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही अनेक समस्या आहेत. या देशात नेमके काय घडतेय, असा सवाल केसीआर यांनी केला. यासाठी देशातील तरुणांना, बुद्धिजीवींना आम्ही आवाहन करतो की, हा परिवर्तनाचा काळ आहे. देशातील चुकीच्या गोष्टी थांबायला हव्यात. देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते, या शब्दांत केसीआर यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

तेलंगणाबाहेर पहिली जाहीर सभा : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज प्रथमच राज्याबाहेर जाहीर सभेला संबोधित केले. भारत राष्ट्र समिती (BRS) या नवीन पक्षाची अध्यक्ष म्हणून स्थापना केल्यानंतर, KCR आपल्या राजकीय कारकिर्दीची नवी इनिंग सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील नांदेड शहरात जाहीस सभा घेतली. यासह पक्ष विस्तारासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव बदलून बीआरएस केल्यानंतर राव यांची तेलंगणाबाहेरील ही पहिलीच जाहीर सभा होती. नांदेड, महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने तेलुगू भाषिक लोक राहतात. त्यामुळे मोठ्या संख्येने स्थानिक लोक जाहीर सभेत सहभागी झाले होते, असा पक्षाचा दावा आहे.

हेही वाचा - K Chandrashekar Rao in Nanded : 'जय महाराष्ट्र'चा नारा देत केसीआर यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री; म्हणाले, अबकी बार...

Last Updated : Feb 5, 2023, 10:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.