ETV Bharat / state

K Chandrashekar Rao in Nanded : 'जय महाराष्ट्र'चा नारा देत केसीआर यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री; म्हणाले, अबकी बार... - केसीआर नांदेड सभा

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नाही. शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे ही खेदाची बाब आहे. तसेच याला भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जबाबदार असल्याचा आरोप तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी केला आहे. बीआरएस पक्षाने आज पहिल्यांदाच नांदेडमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी 'अबकी बार किसान सरकार'चा नारा केसीआर यांनी दिला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 5, 2023, 3:42 PM IST

Updated : Feb 5, 2023, 7:11 PM IST

केसीआर यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री

नांदेड - स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नाही. शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे ही खेदाची बाब आहे. तसेच आता शेतकऱ्यांनी एकजूट होण्याची गरज आहे, असे म्हणत तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

मोदी सरकारवर टीका - आगामी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा. महाराष्ट्राच्या सरकारला झुकावेच लागेल. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले. त्यावर मोदी सरकराने एक शब्दही काढला नाही. त्यामुळे भाजप सरकारला शेतकऱ्यांची काहीच चिंता नसल्याची टीका केसीआर यांनी नांदेडमध्ये बोलताना केली.

शेतकरी आत्महत्येचे दु:ख : भारत राष्ट्र समितीने रविवारी नांदेडमध्ये मोठी रॅली काढली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर सभेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही लोकांना ना पिण्यासाठी पाणी मिळत आहे, ना सिंचनासाठी. इतकी सरकारे आली आणि गेली त्यांनी काय केले? हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचे खुप दु:ख वाटते असे देखील राव म्हणाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार : पुढे बोलतांना राव म्हणाले की, 'अब की बार किसान सरकार' येणार आहे. आता आपल्याला राष्ट्रीय स्तरावर जायचे आहे. देशात मोठ्या बदलाची गरज आहे. बरेच लोक येतात, लांबलचक भाषणे देऊन निघून जातात. मात्र 75 वर्षांनंतरही देशाला पाणी, वीज मिळत नाही. ही खरी शोकांतीका आहे असे मत त्यांनी मांडले. राजकीय नेते फक्त भाषण देण्यात व्यस्त आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.

अब की बार किसान सरकारचा नारा : केसीआर यांनी रॅलीपूर्वी सांगितले होते की, त्यांच्या सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी, विकास योजनांमुळे शेजारील राज्यातील अनेक गावे तेलंगणामध्ये विलीन होऊ इच्छित आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीआरएसचा नारा 'अब की बार किसान सरकार' असेल, असे राव यांनी नुकतेच सांगितले होते.

तेलंगणाबाहेर पहिलीच जाहीर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज प्रथमच राज्याबाहेर जाहीर सभेला संबोधित केले. भारत राष्ट्र समिती (BRS) या नवीन पक्षाची अध्यक्ष म्हणून स्थापना केल्यानंतर, KCR आपल्या राजकीय कारकिर्दीची नवी इनिंग सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील नांदेड शहरात जाहीस सभा घेतली. यासह पक्ष विस्तारासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव बदलून बीआरएस केल्यानंतर राव यांची तेलंगणाबाहेरील ही पहिलीच जाहीर सभा होती. नांदेड, महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने तेलुगू भाषिक लोक राहतात. त्यामुळे मोठ्या संख्येने स्थानिक लोक जाहीर सभेत सहभागी झाले होते, असा पक्षाचा दावा आहे.

चंद्रशेखर राव यांचेअनेक मंत्री गेल्या दोन दिवसांपासून नांदेडमध्ये तळ ठोकून होते. यानिमित्ताने नांदेड शहर चांगलेच सजले होते. शहरात अनेक किलोमीटरपर्यंत गुलाबी तोरण लावण्यात आले होते. यासोबतच मोठमोठे होर्डिंग, फुगे, स्टिकर्स लावून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात होता.

गुरुद्वारामध्ये घेतले दर्शन - मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये येताच गुरुद्वारामध्ये येऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत तेलंगाणा राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती होती. दर्शनानंतर गुरुद्वारा बोर्डाकडून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पारंपारिक वस्त्रे देऊन सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - Maharashtra Politics: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 10 फेब्रुवारीला बैठक; सत्यजित तांबेंच्या आरोपांवर होणार चर्चा

Last Updated : Feb 5, 2023, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.