ETV Bharat / state

नांदेडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांचे पथक तयार

जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 16 अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कार्य करणार आहे.

नांदेडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांचे पथक

author img

By

Published : Jul 31, 2020, 9:59 PM IST

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे 16 अधिकाऱ्यांचे एक पथक निर्माण केले आहे. हे पथक कोविड-19 च्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या उपचारासंबंधीत व त्यांना देण्यात येणाऱ्या सोई-सुविधा, स्वच्छता विषयक बाबी, डॉक्टर, नर्ससच्या समस्या, रुग्णांच्या समस्या व इतर आरोग्य विषयक समस्या आदी पडताळून घेण्याचे काम करेल. याचबरोबर जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा शासकीय रुग्णालय, कोविड-19 साठी निर्माण केलेले केंद्र (सीसीसी) व यात असलेल्या कोविड बाधितांना पुरविल्या जाणाऱ्या सोई-सुविधा व उपचाराबाबत योग्य नियोजनासाठी समन्वय अधिकारी म्हणून हे पथक कार्य करेल.

जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. याला आटोक्यात आणण्याकरता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यात हे 16 अधिकाऱ्यांचे पथक कार्य करणार आहे. या पथकात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांची हदगाव येथे, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार यांची0 हिमायतनगर, भोकरचे कार्यकारी अभियंता शंकर व्‍ही. तोटावाड यांची किनवट येथे, किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी बी.पी.कदम यांची माहुर येथे, जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार यांची देगलूर येथे, शिक्षणाधिकारी (मा.) बालासाहेब कुंडगीर यांची मुखेड येथे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सुधीर ठोंबरे यांची बिलोली येथे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांची नायगाव येथे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी पा.पु. व स्‍वच्‍छता दिलीप इंगोले यांची नांदेड येथे, कार्यकारी अभि. बांधकाम विभाग (उत्‍तर) अनिल करपे यांची अर्धापूर येथे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (म.व बा) सुनिल शिंगणे यांची कंधार येथे, नांदेड उप‍विभागीय कृषी अधिकारी एम.के. सोनटक्‍के यांची लोहा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच, जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांची धर्माबाद येथे, राज्‍यकर सह आयुक्‍त राहुल कळसे यांची उमरी येथे, जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. एम.आर.रत्‍नपारखी यांची भोकर येथे, कृषी उपसंचालक एम. के. सोनटक्‍के यांची मुदखेड येथे यांना समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.